Breaking

शुक्रवार, ८ डिसेंबर, २०२३

चांदज ते टणू भीमा नदीवरील पुलाच्या कामासाठी बजेट मधून 3.60 कोटी मंजूर......खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर.*



*चांदज ते टणू भीमा नदीवरील पुलाच्या कामासाठी बजेट मधून 3.60 कोटी मंजूर......खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर.* 


टेंभुर्णी/प्रतिनिधी 
दिनांक 31 जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस  यांच्याकडे माढा लोकसभा मतदारसंघातील अनेक विकास कामासंदर्भात लावलेल्या बैठकीमध्ये माढा तालुक्यातील रांजणी ते नरसिंहपुर रस्ता तसेच चांदज ते टणू भीमा नदीवरील पुल बांधणे या कामाची मागणी माढा तालुका अध्यक्ष योगेश बोबडे यांनी लोकसभेचे खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे मागणी केली होती याबाबत खासदारांनी वरती याबाबत  मागणी केली होती त्यास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री  देवेंद्रजी फडणवीस यांनी कॅबिनेटमध्ये मंजुरी दिली.
सध्या चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये या कामाला बजेटमध्ये 3.7 कोटी निधी मंजूर करण्यात आलेला असून लवकरच या पुलाचे काम चालू होणार आहे अशी माहिती माननीय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
सदर पुलाचे काम झाल्यामुळे माढा तालुक्यातील नागरिकांना खूप फायदा होणार आहे त्यामध्ये या फुलाचे काम मंजूर केल्यामुळे व त्यासाठी निधी उपलब्ध केल्यामुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री  देवेंद्रजी फडणवीस व माढा लोकसभेचे खासदार माननीय रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे माढा तालुका अध्यक्ष योगेश बोबडे व तालुक्यातील नागरिकांच्या वतीने खासदार निंबाळकर यांचे अभिनंदन होत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा