Breaking

शनिवार, ९ डिसेंबर, २०२३

माळशिरस तालुक्यातील जि प शाळेच्या इमारतीसाठी निधी दया अधिवेशनात आ रामभाऊ सातपुते यांची अधिवेशनात मागणी.




माळशिरस तालुक्यातील  जि प शाळेच्या  इमारतीसाठी  निधी दया अधिवेशनात आ रामभाऊ सातपुते  यांची अधिवेशनात  मागणी.     



      पिलीव प्रतिनिधी प्रमोद  भैस -

  माळशिरस तालुक्यातील  जि प शाळांच्या  इमारतीची प्रचंड  दुरावस्था झाली आहे  जवळपास  १०० इमारतीची दुरावस्था झाली आहे.  सदरच्या  इमारतीची धोकादायक  झाल्या  असुन दुर्घटना  घडण्याअगोदर  शासनाने  यासाठी  निधी उपलब्ध करून  दयाव्यात अशी मागणी  आ रामभाऊ सातपुते यांनी  नागपूर येथील  हिवाळी अधिवेशनात  केली.शासन शहरातील  शाळांना  सोयी सुविधा  पुरविते मग ग्रामीण  भागातील  शाळा ज्या ठिकाणी  शेतकऱ्यांनची ,गोरगरीबांची मुले शिकतात त्याठिकाणी  सोयी सुविधा  दिल्या  जात नाहीत. शासनाने  जि प शाळांसाठी चांगल्या  सुविधा  पुरविण्यासाठी  निधी दयावा तसेच  जि प प्राथमिक  शाळेत पहीली ते चौथीपर्यत  वर्ग  आहेत अनेक  शाळेत एकच शिक्षक असल्याने  विदयार्थनचे नुकसान होत आहे. त्यामुळे  शिक्षकांची पदे ताबडतोब  भरावीत .माळशिरस  तालुक्यातील  १०० धोकादायक  इमारतीच्या  बांधकामासाठी ताबडतोब  निधी उपलब्ध  करुन  दयावी अशी  मागणी  आ रामभाऊ सातपुते यांनी  शालेय शिक्षण मंत्री  उदय सामंत  यांच्या कडे सभागृहात केली.आमदार  रामभाऊ सातपुते यांच्या  मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत  आपण प्रश्न  मार्गी  लावणार  असल्याचे आश्वासन दिले.आमदार  रामभाऊ सातपुते  यांच्या सदरच्या  मागणीमुळे  माळशिरस तालुक्यातील  शिक्षणप्रेमी  व शिक्षकांमधुन समाधान व्यक्त केले  जात आहे.  फोटो  - आ रामभाऊ सातपुते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा