47 कोटी ऊस बिल शेतक-यांच्या खात्यावर जमा
20 डिसेंबर अखेर ऊस बिल जमा......आ.बबनराव शिंदे
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब कारखान्याचे 20 डिसेंबर अखेर ऊस बिल शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्यात आले असल्याची माहीती संस्थापक अध्यक्ष आ.बबनराव शिंदे यांनी दिली.
अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले की, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब येथील सन 2023-24 चा गाळप हंगाम सुरू असून युनिट नं.1 येथे आजअखेर 6 लाख 87 हजार 117 मे.टन ऊस गाळप झाले आहे.युनिट नं.2 येथे आजअखेर 2 लाख 31 हजार 725 मे.टन ऊसाचे करणेत आले आहे. दोन्ही युनिटचे मिळून आजअखेर 9 लाख 18 हजार 842 मे.टन ऊसाचे गाळप झालेले आहे.
या गळीत हंगामामध्ये युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब कडे 11 ते 20 डिसेंबर या कालावधीत गाळपास आलेल्या पाचव्या 10 दिवसाचे ऊसास प्रति टन रू.2700/-प्रमाणे पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. त्यापोटी कारखान्याने 47 कोटी 02 लाख बँकेत जमा केले आहेत.
सदरप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे, कार्यकारी संचालक, जनरल मॅनेजर व इतर अधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा