Breaking

शनिवार, ९ डिसेंबर, २०२३

सोलापूर जिल्हयातील सर्व सरकारी रुग्णालयामध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन दयाव्यात आ रामभाऊ सातपुते यांची अधिवेशनात मागणी



सोलापूर  जिल्हयातील  सर्व  सरकारी  रुग्णालयामध्ये  अत्याधुनिक  सुविधा उपलब्ध  करुन  दयाव्यात  आ रामभाऊ सातपुते यांची अधिवेशनात  मागणी      
      


    पिलीव प्रतिनिधी - 
 सोलापूर  जिल्हयातील  जिल्हा  रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय  व आरोग्य केंद्रात  अत्याधुनिक  आरोग्य  सुविधा  उपलब्ध  करुन  दयाव्यात अशी मागणी  आ रामभाऊ सातपुते  यांनी अधिवेशनात  आरोग्यमंत्री  डॉक्टर तानाजी सावंत यांच्याकडे  केली.सोलापूर  जिल्हायातील सर्वच रुगणालयांची अवस्था  बिकट आहे  यामध्ये  सोलापूर  येथील जिल्हा  रुगणालयात सिटी स्कॅन  मशीन नाही  तर अकलुज  येथील  आरोग्य  उपजिल्हा रूग्णालयात  स्वच्छता कर्मचारी नाही. अनेक  रुगणालयात सिटी  स्कॅन मशीन ,एक्स रे मशीन व इतर सोईसुविधा नाहीत तसेच  याठिकाणी  सिटी स्कॅन, एक्स  रे ऑपरेटर नाहीत तर जिहयातील अनेक रुगणालयात स्वच्छता  कर्मचारी  तसेच  इतर अनेक  जागा रिक्त  यामुळे  सर्व सामान्यांना  चांगली रुग्णसेवा  मिळत नाही. शासनाने  ताबडतोब  नोकरी भरती करावी ती नोकर भरती प्रक्रिया पारदर्शक  पणे राबवावी तसेच ही भरती लवकरात लवकर  करावी तसेच  सोलापूर  जिल्ह्यातील  जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र  याचे ताबडतोब  स्टृकचरल आडिट  करावे अशी मागणी केली.तर योगायोगाने  आरोग्यमंत्री  हे आपल्या  जिल्हयातील  असल्यासारेखच आहेत यामुळे  सोलापूर जिल्ह्यातील हा प्रश्न  त्यांनी आरोग्य  यंत्रणेचे स्टृकचरल आडिट  करावे अशी मागणी  यावेळी  त्यांनी  अधिवेशनात केली .यावर  आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी  हे अधिवेशन  संपल्यानंतर आठ दहा  दिवसात  संपुर्ण  सोलापूर जिल्ह्यातील सर्वच  रुगणालयांची  पाहणी करुन बैठक लावुन एक - दोन महीन्यात हा प्रश्न  मार्गी  लावणयाचे आश्वासन  यावेळी  आरोग्य  मंत्रयांनी दिले. फोटो  - आ रामभाऊ सातपुते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा