Breaking

शुक्रवार, १ डिसेंबर, २०२३

बेकायदेशीरपणे होर्डींग काढण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या मीरा शिंदे यांचे श्रीगोंदा नगरपरिषदे समोर आमरण उपोषण सुरू



बेकायदेशीरपणे होर्डींग काढण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या मीरा शिंदे यांचे श्रीगोंदा नगरपरिषदे समोर आमरण उपोषण सुरू 


श्रीगोंदा-नितीन रोही.                नगरपरिषद हद्दीतील ५४८ डी मुंबई – बीड हा राष्ट्रीय महामार्गालागत आणि मुख्य चौकात बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेल्या होर्डींग तातडीने काढण्याच्या मागणीसाठी  सामाजिक कार्यकर्त्या मीरा शिंदे यांनी गुरुवार दि. ३० नोव्हेंबर पासून श्रीगोंदा नगरपरिषद कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरु केले आहे. 
यावेळी शिंदे म्हणाल्या की, मागील महिन्यापासून बेकायदेशीर होर्डिंग्ज काढण्यासाठी पाठपुरावा करत असूनही प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत योग्य दखल न घेतल्याने मी आमरण उपोषणास बसले आहे. या अनधिकृत लावण्यात आलेल्या होर्डींगमुळे वाहतुकीच्या कोंडी होवून दुर्घटना घडू शकते. त्यामुळे शहरातील लावण्यात आलेले सर्व अनधिकृत होर्डिंग्ज काढून संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल होत नाहीत.  तसेच काढलेले होर्डिंग्ज पुन्हा लागणार नाहीत याची हमी नगरपरिषदे कडून मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार आहे. 
या आंदोलनास मराठी पत्रकार संघ, श्रीगोंदा प्रेस क्लब, संभाजी ब्रिगेड, बजरंग दल, लहुजी शक्ती सेना या संघटनांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने पाठिंबा दिला आहे.  
 
नगरपरिषदेकडून होर्डिंग धारकांना नोटीस बजावून तीन दिवसांत स्वतः होर्डिंग काढून घेतले नाही तर नगरपरिषद ते होर्डिंग काढून त्याचा सर्व खर्च जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव करून वसूल किंवा मालमत्ता करामध्ये समायोजित केला जाईल अशा नोटीसी बजावण्यात आल्या आहेत.  पोलीस बंदोबस्त न मिळाल्यामुळे उद्या सकाळी होर्डिंग्ज काढण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांनी दिली. 

चौकट :- सामाजिक कार्यकर्त्या मीरा शिंदे यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा धसका घेत पालिकेकडून कारवाई झाल्यास होणारे नुकसान टाळण्यासाठी होर्डिंग धारक स्वतः होर्डिंग काढून घेत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा