Breaking

गुरुवार, २१ डिसेंबर, २०२३

कुसमोडची कन्या स्वरांजली जाधव हिला थोडा राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण व सिलव्हर पदक



कुसमोडची कन्या  स्वरांजली जाधव हिला थोडा राज्यस्तरीय  स्पर्धेत सुवर्ण  व सिलव्हर पदक    



       ( पिलीव प्रतिनिधी प्रमोद भैस-  माळशिरस )


 तालुक्यातील  कुसमोड  गावची कन्या  स्वरांजली विजय जाधव हिने पारनेर तालुक्यातील  राळेगणसिद्धी  येथे आयोजित करण्यात  आलेल्या  कराटे स्पर्धेत सुवर्ण  व सिलव्हर पदक मिळवले. या राज्यस्तरीय  स्पर्धेत  एकुण  १२५ विदयार्थीनी सहभाग  नोंदविला होता. यामध्ये  स्वरांजलीने दैदीप्यमान यश संपादन केले  व एक सुवर्ण व सिलव्हर  पदकांची  कमाई केली.तिची भोपाळ येथे होणाऱ्या  राष्ट्रीय   स्पर्धेसाठी निवड  झाली आहे. स्वरांजली सध्या  पुणे येथील  सिंहगड पब्लिक  स्कूलमध्ये  नववीमध्ये  शिक्षण घेत आहे. स्वरांजली हिच्या  या यशाबद्दल   पिलीव ,कुसमोड  परीसरातील विविध क्षेत्रातील  मान्यवराकडुन  तिचे अभिनंदन व  कौतुक  केले जात आहे.       फोटो  - स्वरांजली जाधव पदकासह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा