Breaking

रविवार, २४ डिसेंबर, २०२३

टेंभुर्णी पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी मुकुंद रामदासी तर उपाध्यक्षपदी सुहास कांबळे यांची निवड....



टेंभुर्णी  पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी मुकुंद रामदासी तर उपाध्यक्षपदी सुहास कांबळे यांची  निवड....


टेंभुर्णी  प्रतिनिधी /  भारत जगताप            
..............................................

          टेंभुर्णी पत्रकार संघटनेची वार्षिक बैठक पत्रकार सिद्धेश्वर शिंदे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होऊन त्यामध्ये आगामी वर्षासाठी संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी दैनिक पुण्यनगरी चे प्रतिनिधी  ज्येष्ठ पत्रकार मुकुंद रामदासी यांची टेंभुर्णी  पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी तर दैनिक सकाळचे सुहास कांबळे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर इतर पदाधिकाऱ्यांमध्ये सचिव  दिव्य मराठीचे गणेश पोळ , सहसचिव म्हणून दत्ता सुरवसे, सल्लागार   संतोष वाघमारे, हरिश्चंद्र गाडेकर विनायक जोशी व दीपक देशपांडे यांच्याही निवडी एकमताने करण्यात आल्या. याप्रसंगी या संघटनेचे सदस्य संतोष वाघमारे विनायक जोशी गणेश स्वामी दीपक पाटील सज्जन शिंदे सचिन जगताप धनंजय भोसले  गणेश भोसले राजेंद्र दडस विकास श्रीखंडे सोमनाथ निर्धार आदी टेंभुर्णी शहर व परिसरातील सर्व पत्रकार उपस्थित होते .नूतन पदाधिकाऱ्यांचा संघटनेच्या वतीने  हृद्य सत्कार करण्यात आला. 



मागील पाच वर्षात सर्वांनी एकत्रितपणे काम करून संघटना नावारूपास आणली व सर्वत्र प्रभाव निर्माण केला आहे .सर्वांना बरोबर घेऊन संघटनेच्या  अडचणी सोडवणे कामी व संघटनेसाठी काही सोयी सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी  सर्वांच्या सहकार्याने मी सदैव प्रयत्नशील  राहीन असे प्रतिपादन नूतन अध्यक्ष जेष्ठ पत्रकार मुकुंद रामदासी यांनी यावेळी केले. याप्रसंगी संतोष वाघमारे गणेश पोळ सिद्धेश्वर शिंदे विनायक जोशी हरिश्चंद्र गाडेकर आदी मान्यवरांनी नूतन सदस्यांचे अभिनंदन करून आपण सर्वांनी अन्याय किंवा अडचणीच्या प्रसंगी एकोप्याने , व सहकार्याने , प्रामाणिकपणे कार्यरत राहू असे सांगून नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा