Breaking

बुधवार, १३ डिसेंबर, २०२३

पैशाच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी तीन आरोपींवर गुन्हा दाखल



पैशाच्या वादातून दोन गटात  तुफान हाणामारी 
तीन आरोपींवर गुन्हा दाखल



महाड :. (मिलिंद माने)
महाड शहरामध्ये गांधारी पुलाजवळ दोन गटात  पैशाच्या वादातून तुफान हाणामारी झाली. या वादात तीन आरोपींवर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या असून  एक चोरीचा गुन्हा तर एक झटापटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
महाड शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  अय्याज युसूफ चिपळूणकर रा.महाड पानसारी मोहल्ला यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार ताबीश जासुद्दीन चरफरे रा, वहूर यांचा आणि त्यांच्या बहिणीच्या पतीचा पैशाचा आर्थिक व्यवहार झाली. याची परतफेड न झाल्याने त्यांनी ताबीश यांना आपला जे. सी. बी. वापरण्या करिता दिला होता. मात्र बहिणीने चावी देत जे सी बी मशीन परत आण्यास सांगितले. त्या नुसार जेसीबी मशीन परत घेऊन आल्या नंतर महाड शहर हद्दीत गांधारी पुला जवळ क्रिकेट ग्राउंड वरती सुफयान शौकत ईसाने आणि ताबीश जासुद्दीन चरफरे दोघे राहणार वहूर यांनी मंगळवारी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांना जे सी बी बद्दल जाब विचारून मारहाण करत चाकूने वार केला.
तर सुफयान शौकत ईसाने यांनी दाखल केलेल्या  फिर्यादी नुसार त्यांच्या ताब्यातील पिवळ्या रंगाचा जे सी बी अंदाजे किंमत २० लाख रुपये हा आरोपी अय्याज युसूफ चिपळूणकर यांनी त्यांच्या समंती शिवाय चोरून नेला. फिर्यादी यांनी विचारणा केली असता आरोपी हे रागात येऊन गाडीतून तलवार काढत फिर्यादी आणि साक्षीदार यांना हात बुक्क्याने मारहाण केली.
 महाड शहर पुन्हा पोलीस ठाण्या समोर १० ते १५ लोकांचा जमाव जमवून मारहाण केली. महाड शहर पोलीस ठाण्यात दोन्ही परस्पर दाखल झालेल्या फिर्यादी नुसार तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा