Breaking

शुक्रवार, १५ डिसेंबर, २०२३

माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय आमदार रामभाऊ सातपुते यांच्यामुळे कुसमोड गावच्या रस्त्याचा ५३ वर्षाचा प्रश्न मार्गी


माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय आमदार रामभाऊ सातपुते  यांच्यामुळे  कुसमोड  गावच्या  रस्त्याचा ५३ वर्षाचा प्रश्न  मार्गी        




   पिलीव प्रतिनिधी प्रमोद भैस - माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय आमदार  यांनी  तालुक्यातील  ग्रामीण  भागातील  रस्त्यांना  अर्थसंकल्पीय हिवाळी अधिवेशनात  १०० कोटीचा निधी  मंजुर  केला यामुळे  ग्रामीण भागातील  रस्ते  चकाचक होणार आहेत. यामध्ये  चांदापुरी - चौक - कुसमोड  रस्ता  प्रजिमा २१७  हया रस्त्यासाठी  ३ कोटी रुपयांचा निधी  आमदार साहेबांनी  मंजूर केला यामुळे  कुसमोड  गावाकडे जाणाऱ्या  रस्त्याचा चक्क ५३ वर्षानी प्रश्न  मार्गी  लागला. या अगोदरच्या  लोकप्रतिनीकडे या रस्तयाची डांबरीकरणासाठी सतत मागणी केली जायची मात्र कोणत्याही  लोकप्रतिनिधीनी लक्ष दिले नाही. चांदापुरी  कडुन  निमगाव  कडुन  येणाऱ्या  रस्तयाचे यापुर्वी  डांबरीकरण  झाले आहे. पण तिथुन पुढे कुसमोड  कडे जाणारा  अंदाजे  चार  किलोमीटर  रस्ता  पुर्ण पणे कच्चा पावसाळयात तर या रस्तावर  गुडघाबर पाणी साचते यातुनच कुसमोड  गावातील विद्यार्थी, नागरिक ,अकलुज माळशिरस  ,व इतर गावाकडे आपला जिव मुठीत धरुन कित्येक  वर्षापासुन  ये जा करतात .खरेतर कुसमोडसह ,झिंजेवस्ती, काळमवाडी, साळमुखवाडी, कोळेगाव, फळवणी येथील  नागरिकांना  अकलुज, माळशिरस  कडे ये जा करण्यासाठी  हा सर्वात जवळचा मार्ग  पण रस्त्याच्या  दुरावस्थने नागरिकांना  प्रचंड  त्रास  सहन करावा  लागत होता. चांदापुरी, सदाशिवनगर, अकलुज, राजेवाडी  तसेच  इतर कारखान्याकडे जाणारी ऊसाची वाहने सुद्धा  याच रस्तयाने  जातात .हा संपूर्ण  रस्ता  प्रभाग दोनमध्ये  येतो याच रस्तयासाठी प्रभाग दोनमधील विद्यमान उपसरपंच, माजी उपसरपंच, विद्यमान ग्रामपंचायत  सदस्यांनी तसेच  नागरिकांनी  भाजपमध्ये प्रवेश केला  होता.आपल्या  व्यथा आमदार  साहेबांनकडे वारंवार  मांडल्या  होत्या  यामध्ये  आमदार  साहेबांनी  आपण हया रस्त्यासाठी निधी  उपलब्ध  करुन  देऊ असे  आश्वासन दिले  होते .ते खरे करुन  दाखविले  यामुळे  कुसमोडकर  ग्रामस्थांमधुन समाधान  व्यक्त  केले जात आहे  .दळणवळणासाठी अत्यंत  महत्वाच्या  रस्तासाठी भरघोस निधी उपलब्ध  करुन  दिल्याबद्दल  कुसमोडकर  ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण  असुन नागरिक  म्हणतात  आमदार साहेबांनी  आमचा ५३ वर्षाचा  दुषकाळ संपविला.             

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा