Breaking

गुरुवार, ११ जानेवारी, २०२४

विठ्ठलराव शिंदे कारखाना राज्य पातळीवरील तांत्रिक कार्यक्षमता व उत्कृष्ठ विकास पुरस्काराने सन्मानित


विठ्ठलराव शिंदे कारखाना राज्य पातळीवरील तांत्रिक कार्यक्षमता व उत्कृष्ठ विकास पुरस्काराने  सन्मानित


मध्य विभागात विजय लोकरे रा.उजनी(मा) व सुरेश आवारे रा.पिंपळनेर यांना ऊस भूषण पुरस्कार प्रदान


बेंबळे प्रतिनिधी                    

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट,पुणे या संस्थेकडून सन 2022-23 चा मध्य विभागातील तृतीय क्रमांकाचा तांत्रिक कार्यक्षमता व प्रथम क्रमाकांचा उत्कृष्ठ ऊस विकास व संवर्धन पुरस्कार गुरूवार दि.11/01/2024 रोजी वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट या संस्थेच्या सन 2022-23 च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केंद्रीय कृषीमंत्री खा.शरदचंद्रजी पवार,  सहकारमंत्री ना.दिलीप वळसेपाटील यांचे शुभहस्ते व साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट चे महासंचालक संभाजी कडु पाटील यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. तसेच कारखान्याचे सभासद विजय लोकरे रा.उजनी(मा) व सुरेश आवारे रा.पिंपळनेर यांना मध्य विभागातील सन 2022-23 चा प्रथम क्रमाकांचा ऊस भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आ.बबनराव शिंदे यांचे कुशल नेतृत्व व मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने सन 2022-23 गळीत हंगामामध्ये युनिट नं.1 पिंपळनेर येथे 18 लाख 41 हजार 420 मे.टन ऊस गाळप करून 11.33 टक्के साखर उता-याने 16 लाख 52 हजार 800 क्विंटल साखरेचे उत्पादन व गाळपक्षमता वापर 103.93 टक्के असल्याने युनिट नं.1 पिंपळनेर या कारखान्याची तृतीय तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कारासाठी व कारखान्याने ऊस उत्पादन व साखर उतारा वाढीसाठी राबविणेत आलेल्या ऊस विकास योजनांचा विचार करून मध्य विभागातील प्रथम क्रमाकांचा उत्कृष्ठ ऊस विकास व संवर्धन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. यापूर्वी कारखान्यास देश व राज्यपातळीवरील 24 पारितोषीके प्राप्त झालेली असून या प्राप्त पुरस्काराने कारखान्याचे नावलौकीकात आणखी एक मानाचा तुरा गोवला गेला आहे

तसेच सदरप्रसंगी वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट,पुणे या संस्थेकडून विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे सभासद विजय शिवलाल लोकरे रा.उजनी(मा) व सुरेश जालिंदर आवारे रा.पिंपळनेर यांना मध्य विभागात कोएम 0265 या ऊसाचे हेक्टरी अनुक्रमे 314.58 व 239.52 मे.टन इतके ऊस उत्पादन घेतल्याने त्यांना ऊस भूषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

सदर प्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे, संचालक विक्रमसिंह शिंदे, निळकंठ पाटील,सुरेश बागल,पोपट गायकवाड,लाला मोरे,संदीप पाटील,सचिन देशमुख,शिवाजी डोके,प्रभाकर कुटे,लक्ष्मण खुपसे,रमेश येवलेपाटील,वेताळ जाधव,कार्यकारी संचालक एस.एन.डिग्रजे,जनरल मॅनेजर एस.आर.यादव,जनरल मॅनेजर प्रोसेस पी.एस.येलपले, चिफ इंजिनिअर एस.डी.कैचे, चिफ केमिस्ट ए.के.जगताप,ऊस विकास अधिकारी एन.के.लगड,कामगार प्रतिनिधी ए.डी.वीर व इतर मान्यवर उपस्थित होते.
Advt.......


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा