भारतीय जनता पक्षाच्या माढा तालुका संयोजक पदी ज्येष्ठ नेते रत्नाकर कुलकर्णी - बेंबळेकर यांची नियुक्ती.....
बेंबळेl प्रतिनिधी
वृत्तांत असा की भारतीय जनता पार्टी पंचायत राज व ग्रामीण विकास सोलापूर जिल्हा व माढा तालुक्याच्या वतीने 'माढा तालुका संयोजक' पदी रत्नाकर कुलकर्णी-बेंबळेकर उर्फ नाना यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे पत्र, भाजपा सोलापूर जिल्हा पंचायत राज ग्रामीण विकास विभागचे संयोजक नितीन विष्णू नागटिळक यांनी त्यांना प्रदान केले आहे.
विशेष वृत्तांत असा कि, रत्नाकर कुलकर्णी- बेंबळेकर यांनी भाजपाच्या ग्रामीण, तालुका ,जिल्हा व राज्य पातळीवर अनेक समित्या व मंडळावर आज पर्यंत कार्य केले आहे.**" राखावी बहुतांची अंतरे.... भाग्य मिळते तदनंतरे"**... या उक्तीप्रमाणे रत्नाकर कुलकर्णी उर्फ रतुनाना यांनी जिल्ह्यातील ज्येष्ठ तसेच युवक लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यापासून ग्रामीण भागातील नागरिकापर्यंत, पक्षासाठी सर्वांची निष्ठेने व निस्वार्थ वृत्तीने समाजसेवा केलेली आहे व म्हणून ते प्रभावी व भारदस्त जेष्ठ व्यक्तिमत्व म्हणून आज सर्वत्र परिचित आहेत व त्या मुळे त्यांचे मार्गदर्शन व समाजकार्य सर्व थरातील सर्वपक्षीय नागरिकांना प्रेरणादायी ठरत आहे. यापुढे रत्नाकर नाना यांचे पंचायत राज व ग्रामविकास विभागासाठी माढा तालुक्यात अत्यंत आदर्श आणि प्रभावी कार्य ठरणार असून पक्ष संघटना व पक्षाला भरभराटीस आणण्यासाठी प्रेरणादायी व आदर्शवत ठरणार आहे हे निश्चित.
रत्नाकर कुलकर्णी - बेंबळेकर यांच्या नियुक्ती बद्दल जिल्हा, तालुका व ग्रामीण भागातील भाजपा सहित सर्व पक्षातील मान्यवरांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून किंवा मोबाईल द्वारे त्यांचे मनस्वी अभिनंदन केले आहे व त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
**** जय श्री राम *****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा