राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत राजनंदिनी पाटील चे घवघवीत यश राजनंदिनी पाटील सुपरस्टार पुरस्काराची मानकरी
टेंभुर्णी प्रतिनिधी
कु.राजनंदिनी प्रदीप पाटील रा. उजनी टे तालुका माढा या विद्यार्थिनीने जी चॅम्प अबॅकस आयोजित राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत सात मिनिटात 100 प्रश्न सोडवून तेही एकही प्रश्न न चुकता शंभर पैकी शंभर गुण मिळवून सुपरस्टार हा अवॉर्ड मिळवला आहे.
तिच्या यशाबद्दल तिला प्रशस्तीपत्रक, गोल्ड मेडल व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
दिनांक सात जानेवारी रोजी पुणे येथे ॲड शार्दुल सुधाकरराव जाधववर एज्युकेशन कॅम्पस नरे येथील महाविद्यालयात ही परीक्षा घेण्यात आली या परीक्षेला सुमारे पंधराशे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला होता.
या परीक्षेत शंभर पैकी शंभर गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सुपरस्टार रँक ने गौरविण्यात आले.शंभर पैकी 99 मार्क्स मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिला क्रमांक दिला जातो. 100 पैकी 98 गुण मिळवणाऱ्यांना द्वितीय क्रमांक तर 100 पैकी 97 गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना तृतीय क्रमांकाने गौरविण्यात येते.
हा पुरस्कार देताना जी चॅम्प अबॅकसचे संस्थापक योगेश देशमाने,आरती देशमाने व तिचे प्रशिक्षक सोनाली गुळमे यांच्या हस्ते राजनंदिनी पाटील व तिचे वडील प्रदीप पाटील व आई मृणाली पाटील यांना देखील मंचावर बोलावून सन्मानित करण्यात आले या अवॉर्ड मिळाल्याबद्दल राजनंदिनी पाटील चे अभिनंदन माऊली शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा सौ सुरजाताई बोबडे व श्री विमलेश्वर विद्यालयाच्या प्राचार्या सौ स्वाती पाटील यांनी राजनंदिनी पाटील हिचे अभिनंदन केले.
या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी राजनंदिनी पाटील चे अभिनंदन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा