Breaking

सोमवार, १५ जानेवारी, २०२४

विमलेश्वर च्या स्वाती पाटील-भोसले आदर्श मुख्याध्यापिका पुरस्काराने सन्मानित .....


विमलेश्वर च्या स्वाती पाटील-भोसले आदर्श मुख्याध्यापिका पुरस्काराने सन्मानित ..... 


बेंबळे। प्रतिनिधी  , AJ 24Taas News Maharashtra  साठी 👉   मुकुंद रामदासी 


           बेंबळे येथील विमलेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य स्वाती भारत पाटील- भोसले यांना सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेच्या वतीने 2023-24 या  शैक्षणिक वर्षात  देण्यात येणार्या आदर्श मुख्याध्यापिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
 

विद्या दानासारख्या पवित्र शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य दिलेल्या योगदानाबद्दल ,सिंहगड इन्स्टिट्यूशन सोलापूर येथे झालेल्या भव्य समारंभात माजी आमदार दत्तात्रय सावंत यांचे हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी पतसंस्थेचे चेअरमन सुरेश गुंड व्हाईस चेअरमन सुप्रिया पांगुळ संचालक जयसिंग रजपूत सचिव चंद्रकांत भोसले यांचे सह विमलेश्वर विद्यालयाचे संचालक, शिक्षक व प्राध्यापक उपस्थित होते.    
                 स्वाती पाटील-भोसले यांचे प्राथमिक शिक्षण बावी (ता. माढा) येथे तर बी ए, एम ए व बी एड शिक्षण अनुक्रमे मोडनिंब, अकलूज व बार्शी येथे झाले आहे. मागील 17 वर्षापासून बेंबळे येथील विमलेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात त्या शिक्षक व सध्या प्राचार्य म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. पडसाळी तालुका माढा येथील संत कुर्मदा सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन भारतनाना मोरे (बावी )यांच्या त्या कन्या असून बेंबळे चे माजी सरपंच गोविंद भोसले यांच्या त्या सुनबाई आहेत. या पुरस्काराबद्दल स्वाती पाटील-भोसले यांचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा