Breaking

रविवार, २१ जानेवारी, २०२४

अयोध्येतील श्रीराम प्रतिष्ठापना निमित्ताने बेंबळे येथील मंदिरात भव्य कार्यक्रमांचे आयोजन ंंंंं



अयोध्येतील श्रीराम प्रतिष्ठापना निमित्ताने बेंबळे  येथील मंदिरात भव्य कार्यक्रमांचे आयोजन ंंंंं


बेंबळे। प्रतिनिधी                  

सोमवार दिनांक 22 जानेवारी रोजी आयोध्या मध्ये होत असलेल्या प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आव्हानुसार बेंबळे येथील श्री विमलेश्वर मंदिर व या ठिकाणी असलेल्या श्री गणेश श्रीराम श्री दत्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या समोरील परिसर सरपंच विजय पवार यांचे सह युवकांनी संघटितपणे पाण्याने धुऊन स्वच्छ केला आहे ,तसेच संपूर्ण गावातील रस्ते चौक व गल्लीबोळ देखील झाडून स्वच्छ करण्यात आले आहेत .या मंदिरातील सभामंडपातील ओवर्या व देवतांचे गाभारे  रंगीबेरंगी फुलांनी सुशोधित करण्यात आले आहेत .

            बेंबळे नगरीत मागील 64 वर्षापासून अखंड रामायण ग्रंथाचे वाचन होत आहे, सोमवार दिनांक 22 रोजी सकाळी नऊ वाजता या रामायण ग्रंथाची व तसेच श्रीरामाच्या  अक्षदा कलशाची पालखीतून नगर प्रदक्षिणा होणार आहे व महा अभिषेकानंतर मंदिरात भजनाचा कार्यक्रम होणार असून दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी प्रभू रामाच्या मूर्तीवर भव्य पुष्पवृष्टी होणार आहे , त्यानंतर महाआरती होऊन मिष्टान्न प्रसादाचे वाटप होणार आहे, सायंकाळी मंदिरात दीप प्रज्वलन करण्यात येणार असून संपूर्ण मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। या  ऐतिहासिक सोहळ्यासाठी गावातील सर्व लहान थोर स्त्री पुरुष  भाविकांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आव्हान करण्यात आलेले आहे.
         या निमित्ताने  सोमवार दिनांक 22 जानेवारी रोजी बेंबळे गावातील अंडी मटण मासे यासह सर्व मांसाहार विक्रीची दुकाने,मांसाहारी व चायनीज विक्रीची भोजनालये तसेच दारू  विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश काढण्यात आला आहे .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच विजय पवार  राघवेंद्र कुलकर्णी ज्ञानेश्वर कुलकर्णी  अभयसिंह भोसले संतोष कुलकर्णी ओंकार जोशी राजू संत राहुल कुलकर्णी  विज्ञान गायकवाड  सिद्धेश्वर साठे एकनाथ कुलकर्णी महेश रामदासी  यांचेसह अनेक युवक व भाविक मंडळी प्रयत्नशील आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा