Breaking

रविवार, २१ जानेवारी, २०२४

रा.काँ.अल्पसंख्यांक विभाग प्रदेश महासचिव पदी शब्बीर जाहीरदार यांची नियुक्ती.....


रा.काँ.अल्पसंख्यांक विभाग प्रदेश महासचिव पदी शब्बीर जाहीरदार यांची नियुक्ती..... 



बेंबळेl प्रतिनिधी                     

            महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री .ना,अजितदादा पवार यांचे शिफारशीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाच्या महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक सेलच्या प्रदेश महासचिव पदी दहिवली ( टेंभुर्णी) येथील शब्बीर बाबासाहेब जागीरदार यांची नियुक्ती करण्यात आल्याचे , अल्पसंख्यांक विभाग प्रदेशाध्यक्ष मोहम्मद खान पठाण यांनी पत्राद्वारे कळवले आहे. आमदार बबनदादा शिंदे यांचे हस्ते हे पत्र शब्बीर जागीरदार यांना निमगाव टे येथे आमदार निवासी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले, आमदार संजय मामा शिंदे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष भैय्यासाहेब शिंदे यांनी याबद्दल शब्बीर भाईंचे अभिनंदन केले.शब्बीर जागीरदार यांनी आतापर्यंत माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे  अध्यक्ष , अल्पसंख्यांक विभाग प्रदेश सचिव, टेंभुर्णी रोटरी क्लबचे अध्यक्ष व रोटरी डिस्ट्रिक्ट ॲग्री चेअरमन अशी पदे भूषविली आहेत.या नियुक्ती बद्दल त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा मतदारसंघाचे अध्यक्ष रमेश पाटील बेंबळे जिल्हा परिषद गटाचे माजी प्रतिनिधी तुकाराम उर्फ बंडू नाना ढवळे टेंभुर्णी पत्रकार संघ व प्रेस क्लबचे सर्व सदस्य व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत यथोचित सन्मान करण्यात आला 


.या प्रसंगी रमेश पाटील, शहाजहान जहागीरदार ,सचिन होदाडे, शहाजान काझी,अजित शेख, फारुक शेख , तनवीर मुलाणी फारुख देशमुख सलीम शेख इकबाल पठाण समीर जहागीरदार, व अनेक मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा