*कुर्डुवाडी शहरात दोन बेंच न्यायालय मंजूर....*
*माढा न्यायालय व सोलापूर जिल्हा न्यायालयाकडून जागेची पाहणी....*
*कुर्डुवाडी,टेंभुर्णी,मोडनिंब परिसरात सर्व नागरिकांत उत्साही आनंद....*
*माढ्याच्या नागरिकांचा मोर्चा व वकिलांच्या प्रतिमेला जोडे मारा आंदोलनाबाबत सर्वत्र तीव्र संताप व निषेध....*
कुर्डुवाडी(अरुण कोरे) प्रतिनिधी,
मुंबई हायकोर्टाने कुर्डुवाडी येथे दोन बेंच न्यायालयास मंजुरी दिली असून त्याबाबत जागेचा प्रस्ताव तातडीने पाठवण्याबाबत जिल्हा न्यायालयांना आदेश आल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे.
विशेषतः टेंभुर्णी-कोढार भाग व मोडनिंब परीसरातील नागरिकांना व वकील मंडळींना माढा न्यायालय फारच दूर असल्याने वेळ व पैशाचा नाहक अपव्यय होत असल्याने माढा न्यायालय वकील मंडळींनी सर्वांना सोयीचे होईल असे कुर्डुवाडी शहरात न्यायालयाची मागणी अनेक वर्षांपासून केली होती ती प्रलंबित होती.
परंतु केंद्र सरकारच्या "न्याय आपल्या दारी"धोरणानुसार मुंबई हायकोर्टाने कुर्डुवाडी येथे दोन बेंच न्यायालयास मंजुरी देऊन २ जानेवारी २०२४ च्या पत्रकान्वये सोलापूर जिल्हा न्यायालयांना कुर्डुवाडीतील सिव्हिल जज्ज ज्युनिअर डिव्हीजन व ज्युडिशिअल मॅजिस्ट्रेट प्रथम वर्गसाठी जागेची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्हा न्यायालयाने माढा न्यायालयास ४ जानेवारी २०२४ रोजी पत्र पाठवून जागेचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.
परंतु दरम्यान माढा येथील न्यायालयच कुर्डुवाडीस जाणार असा कांगावा करून राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी माढेकरांनी कुर्डुवाडीच्या न्यायालयास विरोध करत मोर्चा,माढा बंद आदी निषेधात्मक आंदोलनाचे हत्यार उपसले.
एवढ्यावरच न थांबता ज्या वकीलांनी कुर्डुवाडी न्यायालयास पाठींबा दिला त्यांच्या निषेधार्थ वकिलांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करुन न्याय क्षेत्राला कलंक लावला.तसेच सोशल मिडियावर टेंभुर्णी, मोडनिंब, कुर्डुवाडी परिसरातील वकील मंडळींना धमकावण्याही दिल्या.व अतिशय गलिच्छ भाषेत टीका टिप्पण्या करुन वाद असल्याचे भासवण्याचाही नाहक प्रयत्न केला.
माढेकरांच्या अडेलतट्टूपणा, गैरकृत्य व राजकीय हेतूविषयी सर्वच क्षेत्रांत तीव्र आक्षेप व निषेध नोंदवला गेला.
वास्तविक पाहता माढा येथील न्यायालयास कुर्डुवाडी,टेंभुर्णी,मोडनिंब परीसरातील नागरिकांचा कोणताही विरोध नाही.पण त्यांच्या सोयीसाठी व वेळ,पैशाचा अपव्यय टळत असेल तर माढेकरांचा विरोधाभास चुकीचा असल्याबद्दल माढा बारमधील वकील मंडळींनी व सुज्ञ नागरिकांच्या शिष्टमंडळानी विनाकारण विरोध करुन वाद निर्माण करु नये अशी विनवणीही केली.परंतू माढेकरांचा अनाठायी खालच्या पातळीवरील विरोध व तोही न्यायालय क्षेत्राबाबत होत असल्याचे पडसाद जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरातील न्यायालय क्षेत्रातही उमटल्याचे दिसून आले.
दरम्यान कुर्डुवाडी येथे "कुर्डुवाडी न्याय संघर्ष समिती" गठीत करुन शिवाजी महाराज चौकात सभा घेण्यात आली.तर सर्व पक्ष,संघटना,व जाती धर्माचे प्रमुखांची बैठक घेऊन "कुर्डुवाडी नागरी हक्क विकास समीती"ची स्थापना करून सामोपचाराने सर्वांना विश्वासात घेऊन संयमाने कुर्डुवाडी येथील नियोजित दोन बेंच न्यायालयाचा प्रश्न हाताळण्याबाबत एकमताने ठरविण्यात आले.
माढा वकील बारचे पदाधिकारी व सदस्य काही काळ दबावाखाली गेले होते. परंतु कायद्याच्या चौकटीतच राहून पक्षकारांच्या हिताच्या दृष्टीने व आपल्या न्याय हक्काच्या पूर्ततेसाठी कोणत्याही वादात न पडता संयमाने व धैर्याने बौद्धिक कौशल्य वापरून करत असलेल्या अथक परिश्रमाबध्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.
दरम्यान न्यायालयीन प्रशासकीय पातळीवर मुंबई हायकोर्ट व जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार कुर्डुवाडी शहर व परिसरातील वेगवेगळया ठिकाणी माढा न्यायालय समीती व बारचे वकील मंडळींनी गेल्याच आठवड्यात प्रत्यक्ष भेट देऊन सोयीच्या जागेची पाहणी केली आहे.
त्याचा तातडीने अहवाल माढा न्यायालयांने जिल्हा न्यायालयास सुपूर्द केल्यानंतर अवघ्या दोनच दिवसात सोलापूर जिल्हा न्यायालय व माढा न्यायालय यांनी पुन्हा संयुक्त रितीने कुर्डुवाडी शहर व परिसरातील वेगवेगळया जागेची व सोयी सुविधांची गेल्याच आठवड्यात पहाणी केली आहे.
जागेच्या संदर्भातही सर्व खात्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सकारात्मकता दाखवली असून सहकार्य करण्याचे त्यांचे धोरण असल्याचे दिसून येते.
न्यायालयाच्या क्षेत्रातही कुर्डुवाडी येथील "नियोजित दोन बेंच न्यायालया"बाबत पक्षकारांच्या हिताच्या दृष्टीने पूर्ण सकारात्मकता दिसून येते आहे.
हायकोर्टाच्या आदेशानुसार कुर्डुवाडी येथे लवकरात लवकर दोन बेंच न्यायालय सुरू होऊन नागरिकांच्या वेळेचा व पैशाचा अपव्यय टाळावा व योग्य हक्काचा न्याय मिळावा यासाठी सर्वच पक्षकार, वकील मंडळी न्यायपालिकेकडे आर्ततेने पहात आहेत.अरुण कोरे(पत्रकार)कुर्डुवाडी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा