Breaking

बुधवार, २४ जानेवारी, २०२४

दूध धंद्यातून आर्थिक जीवन उंचावण्यासाठी शासनाने सर्वतोपरी सहकार्य करावे.... ....विक्रम दादा शिंदे



दूध धंद्यातून आर्थिक जीवन उंचावण्यासाठी शासनाने सर्वतोपरी सहकार्य करावे....
                      ....विक्रम दादा शिंदे


 बेंबळे lप्रतिनिधी                   

              दूध धंद्यातून आर्थिक जीवन उंचावण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करावे असे प्रतिपादन कमला भवानी शुगर फॅक्टरी चे चेअरमन तथा माढा पंचायत समितीचे माजी सभापती विक्रम दादा शिंदे यांनी केले आहे, बेबळे येथे आर्या दूध संकलन केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते, अध्यक्षस्थानी भाजपचे ज्येष्ठ नेते रत्नाकर कुलकर्णी होते .सर्वप्रथम भीत कापून दूध संस्थेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी चेअरमन भीमराव पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीपराव भोसले, संजय माने, दादासाहेब देवकुळे सतीश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.


विक्रम दादा शिंदे पुढे म्हणाले की दुधाचे भाव वाढतात  पण लगेच शासन ते कमी करण्याचा प्रयत्न करते, परंतु त्याचबरोबर  पशुखाद्य ,औषधे, जनावरांच्या किमती, मजुरी चारावैरणीचे दर यामध्ये काही फरक पडत नाही, त्यामुळे दूध उत्पादकांना दर परवडत नाही व तोटा होतो, तरीपण दर दहा दिवसाला नगदी पैसे मिळतात म्हणून शेतकरी दूध धंद्याचा स्वीकार करतो आहे, परंतु शासनाने दूधाला जास्तीत जास्त दर मिळेल अशी धोरणे आखावीत म्हणजे हा धंदा                 
  निश्चीत  मोठ्या प्रमाणावर वाढेल, याप्रसंगी शिंदे यांनी साखरेच्या दरातील चढ-उतार व शासनाच्या धोरणाविषयी नाराजी व्यक्त केली व ऊस उत्पादकांना चांगला भाव मिळावा यासाठी शासनाने साखर उद्योगाच्या धोरणांचा सकारात्मक विचार करावा असे प्रतिपादन केले. याप्रसंगी हेरिटेजचे संजय माने यांनी मुक्त गोठा पद्धत जनावरांची स्वच्छता वेळोवेळी देण्यात येणारी औषधे तसेच आहार व संगोपन याविषयी मार्गदर्शन केले .प्रास्ताविक मध्ये डॉक्टर पवार म्हणाले की या दूध संस्थेमध्ये अत्याधुनिक मशीनद्वारे  दुधाचे फॅट,डिग्री याची तपासणी होऊन जागेवरच आज आपल्या दुधाचे किती पैसे झाले हे  उत्पादकांना समजणार आहे तसेच दर पाच ते सात दिवसांनी उत्पादकाच्या खात्यावर दुधाची पेमेंट बँकेत जमा होणार आहे त्यामुळे या संस्थेस सर्वानी सहकार्य करावे. सूत्रसंचालन अशोक भोसले यांनी केले तर आभार  प्राध्यापक कल्याण  अनपट यांनी मानले. याप्रसंगी अनेक मान्यवर सह शेकडो दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा