शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे जयंती नमित्ताने श्रीगोद्यात भव्य रक्तदान शिबिर ...
श्रीगोंदा- नितीन रोही,
हिंदुरुदय सम्राट सरसेनापती शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सवा निमित्त भव्य रक्तदान शिबिर गुरुवार दिनांक 4/1/2024 रोजी श्रीगोंदा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे श्रीगोंदा शहर वाचनालय समोर संपन्न झाले या रक्तदान शिबिरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये युवक महिलावर्ग नागरिकांनी सहभाग नोंदवला रक्तदान शिबिरामध्ये 97 रक्तदात्यांनी रक्तदानामध्ये सहभाग नोंदवला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे श्रीगोंदा तालुका व शिव आरोग्य सेना श्रीगोंदा तालुका यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते, या रक्तदान शिबिराचे उद्घाटन शिवसेना उपनेते साजन भैय्या पाचपुते यांच्या मातोश्री सुनंदा वहिनी पाचपुते व शिवा आरोग्यसेना जिल्हाप्रमुख इम्ताज भाई शेख यांच्या शुभहस्ते संपन्न झाले रक्तदान शिबिर शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे यांच्या पुढाकाराने संपन्न झाले.रक्तदान शिबिरामध्ये विशेष मेहनत शिवाआरोग्य सेना जिल्हा उपप्रमुख रावसाहेब डांगे, शिवा आरोग्य सेना तालुकाप्रमुख संभाजी घोडके, शिवा आरोग्यसेना शहर प्रमुख दिलीप आनंदकर ,सागर खेडकर, सुदाम मखरे, ओमकार शिंदे, राजू तोरडे, सुरेश देशमुख,निलेश साळुंके, शिवसेना शहरप्रमुख संतोष खेतमाळीस, मा.शहरप्रमख हरिभाऊ काळे,शहाजी बोरुडे, सुनील घोडके,नितीन शिंदे, विजय सावंत यांच्या विशेष मेहनतीने हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सव निमित्त या पंधरादिवसामध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत असे मत शिवसेना तालुका प्रमुख बाळासाहेब दुतारे यांनी व्यक्त केले,यावेळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यातील शिवसैनिक, युवासैनिक,आरोग्य सैनिक, महिला आघाडी उपस्थित होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा