*जिजाऊ प्रमाणे पत्रकारितेतील कणखरपणा आणि सामाजिक बांधिलकीचा सर्वांनी अंगिकार करावा.... ज्येष्ठ पत्रकार अरुण कोरे यांचें प्रतिपादन*
*भक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ जयंती व पत्रकार दिन उत्साहात साजरा....*
कुर्डुवाडी,अरुण कोरे, प्रतिनिधी
राष्ट्रमाता जिजाऊ यांचे चरित्र कणखर,सामाजिक बांधिलकी, संभाषण कौशल्य यांनी प्रेरीत असून हाडाच्या पत्रकारांना त्याच पठडीतून मार्गक्रमण करावे लागते त्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अरुण कोरे यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य रोहीदास सोनवणे होते.
जिजाऊंची जयंती आणि पत्रकार दिनानिमित्त संयुक्त कार्यक्रम करून सामाजिक भक्ती संघटनेने आपली सामाजिक बांधिलकीची जबाबदारी पार पाडल्याचे सोनवणे सरांनी प्रतिपादन केले.
*भक्ती सामाजिक संस्था*
*भक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब जयंती व पत्रकार दिन रसिका टॉवर माढा रोड येथेये आयोजित करण्यात आला यावेळी प्रथम ज्येष्ठ पत्रकार अरुणजी कोरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व सर्व पत्रकार बंधू आणि मान्यवरांच्या हस्ते जिजाऊ प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली त्यानंतर पत्रकार दिना निमित्त बांधवांचा सन्मान सत्कार करण्यात आला तसेच शालेय विद्यार्थ्यांना जिजाऊ जयंती निमित्त 'जिजाऊ चरित्र' पुस्तकांचे वाटप पत्रकार बांधव व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळीविनायक( काका )दीक्षित, विनायक( आबा) पाटील लक्ष्मण (तात्या) कांबळे, शिरीष कुमार महामुनी,राहुल जी धोका, विजय चव्हाण ,उल्हास पाटीलहे पत्रकार बांधव तसेच कुर्डूवाडी मंडळ अधिकारी सूर्यकांत डिकोळे, प्रवीण बोटे साहेब महात्मा फुले कॉलेजचे प्राचार्य रोहिदास सोनवणे ,नागनाथ माळी सर नवीन मराठी शाळेचे निलकंठ सोनवणे सर ,सौ सरिका परबत मॅडम कापसे सर,विशाल गोरे बालाजी लुक्कड ,रामलिंग नलवडे ,मोहन भराटे शुभम गुंड, राहुल पवार, श्रीकांत क्षीरसागर शिवराज आळगी हे मान्यवर तसेच संस्थेचे सर्व सदस्य उपस्थित होते आभार हरीश भराटे यांनी मानले..*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा