Breaking

गुरुवार, ४ जानेवारी, २०२४

बेलवंडी पोलीस स्टेशनच्या पथकाकडून बळजबरीने पळवून आणलेल्या वेठबिगार इसमाची मुक्तता-



बेलवंडी पोलीस स्टेशनच्या पथकाकडून बळजबरीने पळवून आणलेल्या वेठबिगार इसमाची     मुक्तता-


श्रीगोंदा- नितीन रोही,

     तालुक्यातील बेलवंडी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गोपनीय बातमीदारां मार्फत बातमी मिळाली होती की कोरेगाव येथे इसम नामे पिंट्या भास्कर काळे वय 50 वर्ष  याने सहा -सात महिन्यापूर्वी कोणत्यातरी रेल्वे स्टेशन वरून एक इसम बळजबरीने पळवून विकत आणलेला असून त्याला बोलता येऊ नये म्हणून त्याचे जिभेचा शेंडा कापलेला असून त्याच्याकडून तो गुलामाप्रमाणे काम करून घेत होता. परंतु मध्यंतरी बेलवंडी पोलीस स्टेशनच्या पथकाने वेठबिगारमुक्तीच्या केलेल्या कारवायांमुळे सदर इसमास कुठेतरी लपवून ठेवलेले होते.त्या  इसमास परत गुलामी करून घेण्यासाठी परत आणलेले  आहे. अशी माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी बेलवंडी पोलीस स्टेशनचे पो.उप.निरीक्षक गाजरे,पो.हवा. नंदू पठारे,विनोद पवार , जावेद शेख ,लेखनिक शिपणकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल रोहिदास झुंजार यांचे पथक नेमून छापा टाकला असता मिळालेल्या माहितीप्रमाणे आरोपी नामे.  पिंट्या भास्कर काळे वय 50 वर्ष, राहणार कोरेगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर याच्याकडे गुलामाप्रमाणे वागणूक देण्यात येत असलेला इसम नामे लीली , (पूर्ण नाव पत्ता सांगता येत नाही )मिळून आल्याने त्याची सुटका करून भा द वि कलम 367,370 वेठबिगारी अधिनियम कलम 16 अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी पिंट्या भास्कर काळे यास अटक करण्यात आलेली आहे. सदर पीडित इसमास कोणत्या रेल्वे स्टेशन वरून किती रुपयात कोणाकडून विकत आणलेले आहे याचा तपास बेलवंडी पोलीस करीत आहेत. 
फोटो,

             अहमदनगर पोलीस अधीक्षक मा.श्री राकेश ओला साहेब यांचे संकल्पनेतील ऑपरेशन मुस्कान अंतर्गत बेलवंडी पोलीस स्टेशनने अद्याप पर्यंत एकूण मानवी तस्करी केलेल्या 21 वेठबिगार इसमांची मुक्तता केली असून 13 गुन्हे दाखल केलेले आहेत.सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब, मा अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे साहेब, मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विवेकानंद वाखारे साहेब यांच्या मार्गदर्शनात संजय ठेंगे यांचे नेतृत्वात करण्यात आली आहे.
       बेलवंडी पोलीस स्टेशन द्वारे सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की आपल्या आजूबाजूला अशाप्रकारे अनोळखी इसमांना आणून त्यांच्यावर अत्याचार करून,अर्धवट उपाशी ठेवून त्यांच्याकडून बळजबरीने विविध कामे करून घेतली जात असल्यास/ भीक मागितली जात असल्यास सदर माहिती पोलिसांना पुरवावी. आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा