*अल्पसंख्याक ग्रामीण क्षेत्र विकास कार्यक्रमातंर्गत माढा विधानसभा मतदारसंघासाठी 3 कोटी रूपयांचा निधी मंजूर-आ.बबनराव शिंदे*
माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ठ माढा,पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील गावामध्ये गावठाण दफनभूमी सुशोभिकरण करणे, रस्ते काँक्रीट करणे, संरक्षण भिंत बांधणे,पेव्हींग ब्लॉक बसविणे , सोलर हायमास्ट बसविणे,व इतर सोयी सुविधा पुरविणेसाठी अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रात मूलभूत व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्यक्रमांतर्गत सन 2023-24 मध्ये 3 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहीती आ.बबनराव शिंदे यांनी दिली.
अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले की, माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ठ माढा,पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील गावामध्ये अल्पसंख्याक समुदाय मोठ्या प्रमाणात असून त्यांना नागरी सुविधा मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. माढा मतदारसंघातील अल्पसंख्याक समुदायास मुलभूत/पायाभूत सुविधा उपलब्ध करून ग्रामीण भागाचा विकास साधणेसाठी शासनाचे अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रात मूलभूत व पायाभूत सुविधा कार्यक्रमांतर्गत निधी उपलब्ध व्हावा यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू होते. त्यानुसार शासनाकडून अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रात मूलभूत व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्यक्रमांतर्गत सन 2023-24 मध्ये 3 कोटी रूपयांचा निधी मंजूर झालेला आहे. या मंजूर निधीतून गावठाण दफनभूमी सुशोभिकरण करणे, रस्ते काँक्रीट करणे, संरक्षण भिंत बांधणे,पेव्हींग ब्लॉक बसविणे , सोलर हायमास्ट बसविणे,व इतर सोयी सुविधा पुरविणेत येणार आहेत. या कामामुळे ग्रामस्थांना मुलभूत व पायाभूत सुविधा उपलब्ध होणार असून ग्रामीण विकासाला चालना मिळणार आहे. या कामाच्या मंजूरीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार यांचे सहकार्य लाभले असल्याचे आ.बबनराव शिंदे यांनी सांगितले.या निधी अंतर्गत मंजूर कामे पुढील प्रमाणे आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा