Breaking

बुधवार, २८ फेब्रुवारी, २०२४

शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये ताबडतोब दयावे अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ रामभाऊ सातपुते यांची मागणी



शेतकऱ्यांना  दुधाला  पाच रुपये  ताबडतोब  दयावे अर्थसंकल्पीय अधिवेशनात  आ रामभाऊ सातपुते यांची मागणी         

                      

  पिलीव प्रतिनिधी प्रमोद भैस-  शासनाने दुधाला  पाच रुपये  लिटर  अनुदान जाहीर  केले आहे  परंतु त्याची अदयापही प्रभावीपणे अमंलबजावणी होताना दिसत नाही. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना  गाई ,म्हैशींना टॅग  मारणयाचे आदेश दिले टॅग  मारुन झाले  .शेतकऱ्यांनी आपले बँक  खात्याची माहिती  दिली  पण अदयापही  अनुदानाची कसल्याही प्रकारची  अमंलबजावणी झालेली नाही. पहाटे  चार वाजल्यापासून  रात्री  झोपेपर्यंत  गाई ,म्हैशी शेतकरी  सांभाळत असतो .एक लिटर दुधासाठी पंचवीस ते तिस रुपये  खर्च  येतो आपण शासन पाच रूपये  अनुदान  देतो तुटपुंजे आहे पण अधिकारी  केवळ कागदी घोडे नाचवत असल्याने  शेतकऱ्यांना अदयापही अनुदान मिळाले नाही. शासनाने  ताबडतोब  यामध्ये  लक्ष घालुन  कोणत्याही प्रकारचे आढे वेढे न घालता शेतकऱ्यांच्या  खात्यात  थेट अनुदान  जमा करावे याची  आपण प्रभावीपणे  अमंलबजावणी  करावी अशी  मागणी  सध्या  सुरु  असलेल्या  अर्थसंकल्पीय अधिवेशनात  माळशिरस तालुक्याचे आ रामभाऊ सातपुते  यांनी करीत सरकारचे शेतकऱ्यांनच्या  प्रश्नाकडे  लक्ष वेधले.      फोटो  - आ रामभाऊ सातपुते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा