रा .काँ. शरदचंद्र पवार गट सामाजिक न्याय विभाग माढा तालुका अध्यक्षपदी सौ.सविता भोसले यांची नियुक्ती ..
.
बेंबळे प्रतिनिधी फोटो
सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीच्या महिला सामाजिक न्याय विभाग माढा तालुका अध्यक्षपदी बेंबळे येथील सविता सतीश भोसले यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे पत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर धनंजय साठे यांनी त्यांना प्रदान केले आहे, याप्रसंगी प्राध्यापक खंडू कांबळे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. सविता भोसले या पारधी समाजातील असून क्रियाशील कार्यकर्त्या आहेत .आपण न्यायाच्या बाजूने राहून जनतेची सेवा करू व पक्षवाढीसाठी सातत्याने प्रयत्न करू असे सौ.भोसले यांनी मनोगत व्यक्त करून पक्षश्रेष्ठींचे आभार मानले . या नियुक्तीबद्दल सौ. सविता भोसले यांचे सर्व थरातून त्यांचे अभिनंदन होत आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा