Breaking

रविवार, १८ फेब्रुवारी, २०२४

राष्ट्रवादीच्या स्वराज्य सप्ताहात**ओबीसी विभाग नियुक्ति पत्राचे वाटप*


*

राष्ट्रवादीच्या स्वराज्य सप्ताहात*
*ओबीसी विभाग नियुक्ति पत्राचे वाटप*  



*औसा/प्रतिनिधी ज्ञानेश्वर सूर्यवंशी*

राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वराज्य सप्ताह सुरु असून राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष नामदार अजित पवार साहेब,प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब,नामदार संजयभाऊ बनसोडे साहेब व ओबीसी प्रदेश अध्यक्ष मा.कल्याण अखाडे साहेब यांच्या सुचनेने औसा येथे लातूर जिल्ह्यातील ओबीसी विभागाचे तालुका अध्यक्ष,शहर अध्यक्ष,शहर कार्याध्यक्ष व पदाधिकारी यांच्या नियुक्ती समारंभ पार पडला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस लातूर जिल्हा अध्यक्ष मा.अफसर शेख हे होते व प्रमुख उपस्थिति प्रदेश सरचिटणीस मा.व्यंकट बेद्रे,मा.बबन भोसले,जिल्हा कार्याध्यक्ष मा.पंडित धुमाळ यांच्या सह ओबीसी जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण बतले,ओबीसी जिल्हा कार्याध्यक्ष सतीष गवळी,शोसल मिडिया लातूर जिल्हा अध्यक्ष शुभम भूमने,मिडिया प्रदेश सरचिटणीस तुषार मादळे  हे होते.या वेळी मान्यवरांच्या हस्ते ओबीसी पदाधिकारी यांना नियुक्ति पत्र देण्यात आले त्यात लातूर तालुका अध्यक्ष -राहुल बोयने,जलकोट तालुका अध्यक्ष-भीकाजी राठोड,अहमदपुर तालुका अध्यक्ष-विष्णु आलापुरे,रेणापुर तालुका अध्यक्ष-सुनील राठोड,निलंगा तालुका अध्यक्ष-ज्ञानेश्वर मोरे,औसा तालुका अध्यक्ष सुधाकर खडके,निलंगा तालुका कार्याध्यक्ष मनोज स्वामी यांच्या सह अनेक पदाधिकारी यांना नियुक्ति पत्र देण्यात आले.या वेळी जिल्हा अध्यक्ष अफसर शेख,व्यंकट बेद्रे,ओबीसी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण बतले यांनी  मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाचे आनेक कार्यरकरते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा