*राजमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने रायगड ते चव्हाणवाडी पायी ज्योत सोहळा*
टेंभुर्णी प्रतिनिधी:. माढा तालुक्यामधील चव्हाणवाडी या गावातील राजमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने रायगड येथून चव्हाणवाडी येथे पाई ज्योत आणली गेली. 16 फेब्रुवारी रोजी राजमुद्रा प्रतिष्ठानचे शिवभक्त मोठ्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड या किल्ल्यावर ती जाण्यासाठी चव्हाणवाडी येथून रवाना झाले व रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व शिवभक्तांनी समाधीचे दर्शन घेतले व शंभू महादेवाच्या मंदिरात ज्योत प्रज्वलित करून चव्हाणवाडी कडे मार्गस्थ झाले.
राजमुद्रा या प्रतिष्ठानच्यावतीने प्रत्येक वर्षी शिवजयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या गडकोट किल्ल्यावरून ज्योत आणली जाते राजमुद्रा प्रतिष्ठानचे शिवभक्त या सोहळ्यामध्ये लहान थोर मोठ्या संख्येने सामील होतात .
टेंभुर्णी येथे ज्योत आल्यानंतर चव्हाणवाडी रोडने भोसले वस्ती नांगरे वस्ती जगताप वस्ती बाळूमामा मंदिर या प्रत्येक ठिकाणी महिला ज्योतीचे ओक्षण करून रांगोळी व ओवाळून स्वागत करतात यावेळी सर्व गावातील शिवभक्त मोठ्या संख्येने हजर असतात व नंतर ज्योतीचे राजमुद्रा प्रतिष्ठान येथे ठेवली जाते व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केले जाते व जिजाऊ वंदना घेण्यात येते यावेळी सर्व महिला लहान मुली गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित असतात
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा