Breaking

सोमवार, ५ फेब्रुवारी, २०२४

१० वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणारा इसम श्रीगोंदा पोलीसां कडुन जेरबंद...


१० वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणारा इसम श्रीगोंदा पोलीसां कडुन जेरबंद...


श्रीगोंदा- नितीन रोही,
श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं १०६/२०२४ भादवि कलम ३७६ ३७६(२) (फ)(ज), ३७६ (अ) (ब), ५०६ सह बाल लैंगिक अत्याचार कायदान्ये दाखल गुन्हयातील फिर्यादी यांनी त्यांची १० वर्षाचे अल्पवयीन मुलगी ही घरी एकटी असताना इसमनामे कोहीनूर आदेश काळे रा. देऊळगाव गलांडे ता. श्रीगोंदा याने अल्पवयीन मुलीवर बळजबरी करुन, छातीवर बसुन बलात्कार केला व सदर बाबत कोणाला सांगीतले तर जिवे ठार मारीन असा दम दिला होता. त्या बाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला होता.

सदर गुन्हयाचा तपास चालु असताना श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. ज्ञानेश्वर भोसले साहेब यांना गुप्त बातमीदारां मार्फत बातमी मिळाली की, वरील नमुद गुन्हयातील आरोपी कोहीनूर आदेश काळे हा पारगाव सुद्रीक ता. श्रीगोंदा येथुन अहमदनगर कडे जात आहे. अशी माहीती मिळाल्याने पोलीस निरीक्षक साहेब यांनी गुन्हे शोध पथकाचे कर्तव्यदक्ष पोलीस उप निरीक्षक श्री. समिर अभंग यांना स्टाफसह जावुन कारवाई करणेस सांगीतले. पोसई अभंग हे पोलीस स्टाफ सह जावुन सदर इसमाचा शोध घेत असताना त्यास पोलीसांची चाहुल लागल्याने तो पळून जावु लागला असता पोलीस पथकाने त्याचा शिताफीने पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले. त्याचेकडे विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा करुन पळुन जात असल्याची कबुली दिली आहे.

सदरची कारवाई मा. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक अहमदनगर, मा. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर, मा. आण्णसाहेब जाधव साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत भाग कर्जत यांचे मागदर्शनाखाली मा. ज्ञानेश्वर भोसले साहेब, पोलीस निरीक्षक श्रीगोंदा, मा. समिर अभंग, पोलीस उप निरीक्षक श्रीगोंदा, पोना ज्ञानेश्वर भागवत, पोकॉ साखरे, पोकों/देवकाते, पोकों सगर यांनी केली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोसई संपत कन्हेरे हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा