Breaking

शनिवार, ३ फेब्रुवारी, २०२४

महाडमध्ये बंद फ्लॅट फोडून आठ लाख नव्वद हजाराचा ऐवज लंपास



महाडमध्ये बंद फ्लॅट फोडून आठ लाख नव्वद हजाराचा ऐवज लंपास


महाड (मिलिंद माने)
महाड शहरातील प्रभात कॉलनी परिसरात असलेल्या एका इमारतीमधील फ्लॅट अज्ञात चोरट्याने फोडून  घरातील दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे लंपास केली आहेत. याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
महाड शहरात प्रभात कॉलनी परिसरातील साई पॅलेस इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर असलेला सेऊल सुभाष शेठ वय ३८ यांच्या मालकीचा फ्लॅट अज्ञात चोरांनी दिनांक १ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा ते ३ फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजेच्या दरम्यान फोडला. या अज्ञात चोरांनी घरातील सोने आणि चांदीचे दागिने तसेच घरासंदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे लंपास केल्याची घटना घडली आहे. या फ्लॅटच्या दरवाज्याची कडी कोयंडा तोडून हत्याराने कपाटाचे दार उघडून लाकडी लॉकर देखील फोडले. लॉकरमध्ये असलेले सोन्याचे ब्रेसलेट, सोन्याचा कडा, सोन्याचे कॉइन, सोन्याचे गळ्यातील सूर्य चित्र असलेले पान, चांदीचा तुकडा, चांदीचे कॉइन, चांदीची फ्रेम, चांदीचे ब्रेसलेट, आणि दोन लाख पन्नास हजार रुपये रोख रक्कम इतर कागदपत्रे असा एकूण ८ लाख ९० हजार १५० रुपयाचा ऐवज लंपास केला. 
याप्रकरणी ठेवून सुभाष शेठ यांनी फिर्याद दाखल केली असून महाड शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरोधात भादवि कलम ४५४, ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड शहर पोलीस या अज्ञात चोराचा अधिक तपास करत आहेत.
 तडवीं समोर आव्हान?
महाड शहर पोलीस ठाण्यात रमेश तडवी यांची प्रभारी पोलीस निरीक्षक पदी दोन दिवसापूर्वी नियुक्ती झाली असून महाड शहरात चोरट्यांचा धुमाकूळ मोठ्या प्रमाणावर वाढला असून अनेक भागातील सीसीटीव्ही यंत्रणा पूर्णपणे बंद आहेत त्याचाच फायदा चोरटे घेताना दिसत असून नव्याने नियुक्त झालेले प्रभारी पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांना या चोरीचा तपास म्हणजे एक आव्हान असल्याचे महाड शहरातील नागरिकांकडून बोलले जात आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा