रेडा येथील श्री संत गुलाबबाबा मंदिर सभा मंडपासाठी 20 लाख रुपये..... महारुद्र पाटील*
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांची घोषणा*
इंदापूर/प्रतिनिधी शशिकांत सोनटक्के
आज दि.9 मार्च 2024 रोजी इंदापूर तालुक्यातील मौजे रेडा (गुलाबनगर) येथे श्री संत गुलाबबाबा यात्रेनिमित्त तसेच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या कार्यक्षम खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या कार्याची माहिती देण्यासाठी इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर कार्याध्यक्ष महारुद्र पाटील आलेले होते.यावेळी ते संत गुलाबबाबा यांच्या भक्तांची गर्दी पाहून भारावून गेले,तसेच पुढील वर्षी काल्याचे कीर्तन हे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या कार्यक्षम खासदार महासंसदरत्न सुप्रियाताई सुळे यांच्या फंडातून दिलेल्या सभामंडपातच होईल अशी ग्वाही दिली. त्यासाठी वीस लक्ष रुपयांची तरतूद केली जाईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.
श्री संत गुलाब बाबा संस्थानाच्या वतीने कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, महिला अध्यक्षा छायाताई पडसळकर, संपर्कप्रमुख अमोल मुळे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी महिला तालुका अध्यक्षा छायाताई पडसळकर,पुणे जिल्हा संपर्कप्रमुख अमोल मुळे, इंदापूर तालुका सामाजिक न्याय विभागाचे उपाध्यक्ष पांडूरंग मोहिते,इंदापूर तालुका संपर्क प्रमुख शशिकांत सोनटक्के,इंदापूर तालुका सरचिटणीस काशिनाथ देवकर, लिगल सेलचे इंदापूर तालुका उपाध्यक्ष राहुल बनसोडे,सामाजिक कार्यकर्ते राहुल बोबडे, नवनाथ देवकर,तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा