Breaking

रविवार, १० मार्च, २०२४

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर.अध्यक्षपदी समीर नाईक नवरे यांची निवड.





डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर.



अध्यक्षपदी समीर नाईक नवरे यांची निवड.

टेंभुर्णी प्रतिनिधी धनंजय भोसले.

टेंभुर्णी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीची बैठक दि.८ मार्च २०२४ रोजी रात्री. ८.३० वा. आयोजित करण्यात आली होती. यादरम्यान विश्वरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती निमित्ताने मिरवणूक, समाज प्रबोधन व पुस्तकवाटप या कार्यक्रमाने साजरी करण्याविषयी सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीमध्ये भीमज्योत रद्द करण्याचा संकल्प केला. यावेळी जयंती उत्सव मंडळाचे नूतन अध्यक्ष म्हणून समीर नाईकनवरे, उपाध्यक्ष निलेश खरात तर खजिनादरपदी नाथा सावंत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सदर बैठकीदरम्यान परमेश्वर ददू खरात, जयवंत पोळ, गौतम कांबळे, रमेश लोंढे, पत्रकार महावीर वजाळे, महेंद्र सोनवणे, दादा थोरात, नितीन खरात, आशिष लोंढे, अक्षय खरात, अमोल खरात, अर्जुन साळवे, विजय साळवे, रोहन लोंढे, करण सरवदे, अमर गायकवाड, रणजित गायकवाड, गणेश लोंढे, गणेश सरवदे, संतोष खरात हे मान्यवर आणि सोबतच समाजबांधवही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा