Breaking

रविवार, ३ मार्च, २०२४

माढा तालुक्यातील जुन्या निष्ठावंत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष**खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर विचारात घेत नसल्याची व्यक्त केली खंत*



*माढा तालुक्यातील जुन्या निष्ठावंत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष*


*खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर विचारात घेत नसल्याची व्यक्त केली खंत*

 टेंभुर्णी : माढा लोकसभेचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व माढा विधानसभा वरिष्ठ पदाधिकारी विचारात घेत नसल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.


वेणेगाव (टेंभुर्णी) येथील हॉटेल जगदंबा कॉटेज या ठिकाणी रविवारी भाजपच्या सर्व जुन्या व नव्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
माढा तालुक्यात होणाऱ्या विकास कामांच्या उद्घाटन व भूमिपूजन समारंभास पक्षाच्या कार्यकर्त्यांना बोलावले जात नाही, वेळोवेळी निवेदन देऊन पाठपुरावा करून केलेल्या कामाचे श्रेय खासदार महोदयांकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना व आमदार बबनराव शिंदे यांच्या कार्यकर्त्यांना दिले जात आहे.
या सर्व गोष्टींची पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी, भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालय तसेच कोर कमेटी या सर्वांनी दखल घ्यावी अशी मागणी भाजप कार्यकर्त्याकडून यावेळी करण्यात आली.

निवडणूकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांना विचारात घेत नसल्याने तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांपेक्षा स्थानिक आमदार व इतर मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांना भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचे श्रेय दिले जात असल्याने अशा व इतर कारणांमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली असून पार्टीने आम्हाला विचारात न घेतल्यास आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत शांत शांत राहण्याचे एकमताने ठरले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून एकनिष्ठपणे भारतीय जनता पार्टीचे काम करत असून आम्हालाच विचारात घेत नसल्याने मतदारांच्या प्रश्नांना तोंड देणे अवघड झाले असून माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर तसेच तालुका अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष गटातटाचे राजकारण करत असल्याने आम्हाला निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जात आहे. त्यामुळे आमच्यावर होणाऱ्या अन्यायाची पक्षाने वेळीच दखल घ्यावी असा इशारा झालेल्या बैठकीत देण्यात आला.
उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते बैठकीतील मुद्दे भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालय तसेच केंद्राध्यक्ष यांच्याकडे तक्रारीच्या स्वरूपात देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
सदरच्या बैठकीस माजी तालुकाध्यक्ष श्रीधर शिंदे. माजी तालुकाध्यक्ष विनायक भगत .माजी तालुकाध्यक्ष आजिनाथ जाधव .माजी तालुकाध्यक्ष संजय दादा टोणपे .ज्येष्ठ नेते बबन भाऊ केचे. भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विष्णू बिचकुले. माजी जिल्हा सचिव प्रवीण मस्के .माढा शहर अध्यक्ष पंचायत राज व ग्रामविकास प्रताप पवार . माढा तालुका सरचिटणीस मदनजी मुंगळे . माढा तालुका मा सरचिटणीस संतोष गवळी . सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी सुभाष इंदलकर .माढा तालुका युवा मोर्चा संयोजक विधानसभा विजय कोकाटे . भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा माढा तालुका मा अध्यक्ष सोमनाथ गायकवाड. मा. तालुका सरचिटणीस राहुल चव्हाण . भाजपा नेते करणजी भगत .माजी सोशल मीडिया तालुकाध्यक्ष विजय परबत. माढा तालुका सहसंयोजक पंचायत राज अक्षय स्वामी .सुपर वॉरियर्स अतुल पवार .भारतीय जनता पार्टी तालुका चिटणीस प्रकाश चोपडे.भारतीय जनता पार्टी किसान संघ माढा तालुका अध्यक्ष अमोल गायकवाड .कार्यकारणी सदस्य अंकुश पवार .कार्यकारणी सदस्य सुनील गायकवाड .भारतीय जनता पार्टी माढा शहराध्यक्ष एडवोकेट बंडू कांबळे. कार्यकारणी सदस्य जगदीश मस्के. माढा तालुका उपाध्यक्ष गणेश साळुंखे . अल्पसंख्याक माढा तालुका अध्यक्ष युवा मोर्चा जमीर काझी . भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा टेंभुर्णी शहर सरचिटणीस अविनाश धोत्रे . कार्यकारणी युवा मोर्चा सदस्य बिरुदेव वाघमोडे . माढा तालुका किसान संघाचे रमाकांतजी बनसोडे .कार्यकारणी सदस्य आकाश हिंगमिरे . भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष टेंभुर्णी प्रतीक माने. भाजपा सदस्य नितीन चव्हाण .सुनील पोळ .तसेच  भारतीय जनता पार्टीचे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते सदर बैठकीस उपस्थित होते...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा