जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत परीवर्तन विकास आघाडीचां दणदणीत विजय......
बेंबळे।प्रतिनिधी। फोटो
पंढरपूर येथे मुख्य कार्यालय असलेल्या व जिल्हा कार्यक्षेत्र आसलेल्या सोलापूर जिल्हा ग्रामसेवकांची सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक अत्यंत चुरशीने होऊन यामध्ये ,महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डिएन ई -136चे माजी राज्य सल्लागार लक्ष्मण गळगुंडे यांचे मार्गदर्शना खाली व करमाळा तालुका अध्यक्ष सुशेन ननवरे ,माढा तालुका माजी सचिव राजेश माळी, मंगळवेढा तालुका माजी अध्यक्ष संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली व त्यांमध्ये विद्यमान जिल्हा अध्यक्ष शरद भजबळ यांच्या "प्रगती पॅनल" विरुद्ध सर्व सामान्य सभासदांच्या "परीवर्तन विकास आघाडी" मधे सरळ लढत होऊन परीवर्तन विकास आघाडी ने सर्वच्या सर्व 16 पैकी 16 जागा जिंकून एकहाती सत्ता काबीज केली व प्रगती पॅनल चा साफ धुव्वा उडवला व सर्व 16 जागांवर मोठ्या मताधिक्याने दणदणीत विजय प्राप्त केला व परीवर्तन घडवून आणले . या निवडणुकीमध्ये प्रतापसिंग भुई या अपक्ष उमेदवारांने परिवर्तन पॅनल ला आपला पाठिंबा दर्शवला होता त्यामुळेही हा एकतर्फी विजय सोपा झाला असल्याचे दिसून येते .
दिनांक 03 मार्च 2024 रोजी पंढरपूर येथील द.ह. कवठेकर प्रशालेमधे सकाळी 8: 00 वां मतदानाला सुरुवात झाली व सायंकाळी 4: 00 वाजता 578 सभासद मतदारापैकी 570 एवढ्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला व याच दिवशी सायंकाळी 7:00 वाजता निकाल जाहीर झाल्यानंतर"परीवर्तन विकास आघाडी" चे 16 पैकी 16 उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी घोषित करण्यात आले , सभासदांनी गुलाल उधळून एकमेकांना मिठाई भरऊन आनंद व्यक्त केला. या निवडणुकीमध्ये विद्यमान अध्यक्ष शरद भुजबळ यांच्या मनमानी व हुकूमशाही वृत्तीच्या कारभाराला सभासदांनी झुगारून लावल्याबद्दल जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी अतिशय समाधान व्यक्त केले व सभासदांना धन्यवाद दिले.
तालुका निहाय विजयी उमेदवार ....
अशोक म्हेत्रे, दयानंद खोबन अक्कलकोट
.कांतु राठोड,सौ.सुजाता व्हणकडे - दक्षिण सोलापूर
.सिद्धेश्वर चौधरी- बार्शी
नेमचंद भुजबळ,श्री.सचिन सरडे - करमाळा
विलास बाबर- माळशिरस
मारुती जुंधले - मंगळवेढा
विलास माने,सौ.मैनावती परबत - मोहोळ
.राजकुमार यादव- माढा
महादेव भुसे ,सौ.ज्योती पाटील - पंढरपूर
.शहाजी इंगोले,श्री.धनाजी गोतसूर्य - सांगोला
या विजयाबद्दल महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनीयन डि एन ई -136 चे राज्याध्यक्ष श्री.संजीवजी(आप्पा) निकम,राज्य सरचिटणीस श्री.सूचितजी घरत उपाध्यक्ष श्री आर डी पाटील साहेब, विभागीय उपाध्यक्ष श्री बाबासाहेब कापसे, सहसचिव श्री दवडे , महीला उपाध्यक्ष सौ सुप्रिया (ताई)सांढभोर तसेच राज्यातील विविध जिल्हाचे जिल्हाध्यक्ष,चेअरमन व राज्य कार्यकारिणी च्या वतीने परीवर्तन विकास आघाडीच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा