सुर्ली चे उपसरपंच वेताळा परमेश्वर कोयले यांचा इंदापूर तालुक्यातील सुरवड येथे अपघाती निधन
टेंभुर्णी : - माढा तालुक्यातील सुर्ली येथील उपसरपंच वेताळा परमेश्वर कोयले (वय-४१) यांचा इंदापूर तालुक्यातील सुरवड येथे अपघाती निधन झाले आहे.ही घटना गुरुवारी दुपारी दोन वा. सुमारास घडली आहे.
वेतळा कोयले हे किराणा व्यवसाय व केळीचा व्यापार करीत होते.यानिमित्त ते इंदापूर तालुक्यात केळी माल पाहण्यासाठी गेले होते.ते सुरवड येथे आले असता समोरील दुचाकीच्या त्यांच्या दुचाकीला सामोरा-समोर जोरात धडक बसली.या अपघातात कोयले हे खाली रोडवर पडले.यामध्ये डोक्यास जबर मार लागल्याने त्यांचा उपचारास घेऊन जाताना मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच खरेदी विक्री संघाचे माजी उपाध्यक्ष रामकृष्ण काळे,संतोष कदम,महादेव काळे,नाना मंडले,आप्पा कदम,सागर तळेकर,दिपक कोयले यांनी घटना स्थळाकडे धाव घेतली.
त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,मुलगी,एक भाऊ असा परिवार आहे.कोयलेत यांच्या अकाली अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा