Breaking

सोमवार, १ एप्रिल, २०२४

2 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आढावा बैठक मेळाव्याचे आयोजन.... आ. बबनदादा शिंदे



2 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आढावा बैठक मेळाव्याचे आयोजन....
                               आ. बबनदादा शिंदे
बेंबळे/प्रतिनिधी.              बबनदादांचा फोटो 

   माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित दादा पवार गट) वतीने, स्नेहल लॉन्स पिंपळनेर येथे, मंगळवार दि. 2 एप्रिल 24 रोजी सकाळी 9.30 वा. तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यास अवश्य उपस्थित राहावे असे आव्हान आमदार बबनदादा शिंदे यांनी केले आहे. याप्रसंगी करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजीतभैय्या शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 
         या प्रसंगी आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भात तालुक्यातील 7 जिल्हा परिषद गट व 14 पंचायत समिती  गणातील गावोगावच्या बुथ वरील कार्यकर्त्यांच्या स्वतंत्र आढावा बैठकी  घेण्यात येणार असल्याचे आवर्जून सांगण्यात आले  .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा