Breaking

शुक्रवार, ५ एप्रिल, २०२४

विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे 2850 प्रमाणे 21 ते31 मार्च पर्यंतचे 42 कोटी रुपये बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा. .............आ.बबनराव शिंदे


विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे 2850 प्रमाणे 21 ते 31 मार्च पर्यंतचे 42 कोटी रुपये बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा.     .............आ.बबनराव शिंदे


बेंबळे.. प्रतिनिधी.                         फोटो 
 
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब कारखान्याकडे 21 ते 31 मार्च दरम्यान गळीतास आलेल्या ऊसाचे अनुदानासह प्रति टन रू.2850/-प्रमाणे अकरा दिवसाचे ऊस बिल शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्यात आले असल्याची माहीती संस्थापक अध्यक्ष आ.बबनराव शिंदे यांनी दिली.
 
अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले की,  विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर येथील सन 2023-24 चा गाळप हंगाम सुरू असून युनिट नं.1 येथे आजअखेर 18 लाख 72 हजार 733 मे.टन गाळप झाले आहे.  तसेच युनिट नं.2 चे हंगामाची सांगता दि.3 एप्रिल रोजी झाली असून युनिट नं.2 येथे  6लाख 25 हजार 888 मे.टन ऊस गाळप होवून 6 लाख 63 हजार 900 क्विंटल साखर पोती तयार झाली आहेत. दोन्ही युनिटचे मिळून आजअखेर 25 लाख   मे.टन ऊसाचे  गाळप झालेले आहे. या हंगामामध्ये दोन्ही युनिटकडे कडे 21 ते 31 मार्च  2024 या कालावधीत गाळपास आलेल्या सर्व ऊसास जाहीर केलेप्रमाणे प्रति टन रू.150/- अनुदानासह प्रति टन रू.2850/-प्रमाणे ऊस बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. त्यापोटी  कारखान्याने 42 कोटी  बँकेत जमा केले आहेत. 
 
तसेच दोन्ही युनिट कडे ऊस तोडणी वाहतूकीसाठी असलेल्या वाहनचालकांची 15 मार्च अखेरपर्यंतची तोडणी वाहतूक बिले अदा करण्यात आली आहेत.
 
*चौकट... दहा दिवसाला ऊस बिल देणारा राज्यातील पहिला कारखाना....

या हंगामामध्ये गळीतास आलेल्या ऊसास 10 दिवसाला ऊस बिल पेमेंट देणे शक्य झाले असून 10 दिवसाला ऊस बिल देणारा विठ्ठलराव शिंदे राज्यातील एकमेव कारखाना आहे. कारखान्याने या हंगामात 16 ते 31 जानेवारी दरम्यान गळीतास आलेल्या ऊसास प्रति टन रू.50/-, माहे फेब्रुवारी मध्ये रू.100/- व मार्च मध्ये रू.150/- या प्रमाणे वाढीव अनुदान दिलेले आहे.

सदरप्रसंगी कारखान्याचे सर्व संचालक , कार्यकारी संचालक संतोष  दिग्रजे, जनरल मॅनेजर सुहास यादव व इतर अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा