भीमा नदी काठावरील नागरिकासाठी सहा तास वीज पुरवठा सुरू होणार
आमदार बबनदादा शिंदे
ना. देवेंद्र फडणीस यांच्या आदेश वरून जिल्हाधिकाऱ्यांनी दिली मान्यता
बेंबळे.. प्रतिनिधी.
पंढरपूर तालुक्यातील भीमा नदी काठावरील गावासाठी वीजपुरवठा सुरू करावा असा आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सोलापूरचे जिल्हाधिकाऱ्यांना दिला असून याची तातडीने जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केलेली आहे व त्यानुसार पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे बंधाऱ्यातून फक्त दोन तास व इतर सर्व बंधाऱ्यातून सहा तास वीज पुरवठा सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिलेली असल्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी सांगितले .
विशेष वृत्त असे की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकरआमदार बबनदादा शिंदे आमदार संजय मामा शिंदे माजी आमदार प्रशांत परिचारक जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजीत भैया शिंदे व कल्याणराव काळे यांनी भेट घेऊन पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीकाठच्या गावासाठी आठ तासवीज पुरवठा सुरू करण्याची मागणी केली होती ,त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सोलापूरचे जिल्हाधिकाऱ्यांना भीमा नदी काठावरील विद्युत पुरवठा सुरू करण्याविषयी आदेश दिला व जिल्हाधिकाऱ्यांनी गुरसाळे बंधाऱ्यावर फक्त दोन तास व पंढरपूर तालुक्यातील इतर सर्व बंधाऱ्यावरुन सहा तास वीज पुरवठा सुरू करण्यास तत्वतः मान्यता दिलेली आहे व या आदेशाची वीज मंडळांने ताबडतोब अंमलबजावणी करावी असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे अशी माहिती आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा