Breaking

शुक्रवार, ५ एप्रिल, २०२४

रोजाच्या पवित्र महिन्यात महिलांना खूप कष्ट घ्यावे लागते.... सौ शीतलदेवी मोहिते पाटील* *


रोजाच्या पवित्र महिन्यात महिलांना खूप कष्ट घ्यावे लागते.... सौ शीतलदेवी मोहिते पाटील*


 *लक्ष्मी आनंद महिला उद्योग समूह यांच्या वतीने महिला रोजा इफ्तार पार्टी कार्यक्रम संपन्न*

टेंभुर्णी प्रतिनिधी*

 टेंभुर्णी येथे मुस्लिम समाजामध्ये पवित्र महिना म्हणून समजला जाणारा रमजान महिन्याचे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते इस्लामी मान्यतेनुसार रमजान महिन्यात इस्लामचा पवित्र धर्मग्रंथ कुराणाच्या अवतरणाचा  प्रारंभ झालेला असल्यामुळे उपवास केले जातात ज्यांनी रोजे असे म्हणतात उपवासाची सुरुवात रमजान महिन्यातील प्रथमचंद्रदर्शन झाल्यानंतर येणाऱ्या पहाटेपासून होते या महिन्यात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अन्न पाणी सेवन न करता कडक उपवास केले जातात इस्लाम धर्माच्या श्रद्धा  प्रार्थना किंवा नमाज दानधर्म जकात उपवास आणि मक्केचे हज यात्रा या पाच प्रमुख तत्त्वांपैकी रमजान महिन्यातील उपवास हे एक तत्व आहे.


महिला रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन मा श्री ऋषिकेश मोहनराव बोबडे यांचे निवासस्थानी बोबडे पार्टी आणि लक्ष्मी आनंद महिला उद्योग समूह यांच्या वतीने करण्यात आले होते.  

या कार्यक्रमास मा.सौ. शीतलदेवी धैर्यशील मोहिते पाटील व माढा नगराध्यक्ष सौ.मीनल ताई साठे यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना शितलदेवी मोहिते पाटील यांनी असे सांगितले की रोजा मध्ये महिलांना पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान सहेरी असते त्यामुळे पहाटे चार पूर्वीच सहेरीचे नियोजन करावे लागते तेथून पुढे दैनंदिन घरातील कामे करून अन्न पाणी न घेता परत संध्या सात वाजता होणाऱ्या रोजाची तयारी ही सायंकाळी पाच वाजले पासूनच करावी लागते इतकी मेहनत ही रोजा करणाऱ्या महिलांना करावी लागते
याबरोबरच मीनल ताई साठे यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्या म्हणाल्या की आज सौ.मोनिका ताई ऋषिकेश बोबडे यांनी जो हा कार्यक्रम आयोजित केला आहे यातून टेंभुर्णी मधील हिंदू मुस्लिम बांधव भगिनींचे एकीचे नातं किती मजबूत आहे हे सिद्ध झाले यावेळी टेंभुर्णी शहरातील सर्व मुस्लिम महिला उपस्थित होत्या आयोजक सौ.मोनिका ताई ऋषिकेश बोबडे यांनी आपले भाषणातून सांगितले की टेंभुर्णी येथील सर्व मुस्लिम परिवार हे एक आमचे कुटुंबच आहे व नेहमीच सुलोख्याचे संबंध आहेत आज पर्यंत आपण सर्वजण नेहमीच एकमेकांच्या सुखदुःखात एकत्र आहोत असेच प्रेम व साथ आम्हास मिळावे आपण नेहमीच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलात व यापुढेही आपण अशीच साथ  द्यावी अशी इच्छा व्यक्त व उपस्थित सर्वाचे आभार मानले केली या महिला रोजा इत्यार पार्टीचे आयोजन केल्यामुळे उपस्थित सर्व महिला वर्गाकडून आयोजकांचे कौतुक होत आहे अतिशय सुंदर नियोजन आयोजकांनी केले होते
या वेळेस कार्यक्रमास उपस्थित सौ. शितलदेवी मोहिते-पाटील माढा नगराध्यक्षा अॅड.सौ.मिनलताई साठे, सौ रत्नमाला बोबडे,माढा उपनगराध्यक्षा सौ.कल्पनाताई जगदाळे माढा नगरसेविका माढा सौ.शबाना बागवान
मा.नगरसेविका सौ. गीतांजली ताई देशमुख इत्यादी महिला उपस्थित होत्या

यावेळी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी परवीन पठाण,अंजुमन पठाण,मनीषा ताबे,सुकेशना अटकळे,कु.विजया देशमुख,अनिसा बागवान,समिना मोमिन,रिजवाना तांबोळी,खतिजा शेख,फातिमा शेख,आयेशा शेख,इंताज शेख,आयेशा शेख,अंजुम सय्यद, सुमैया सय्यद, बुशरा सय्यद, आदीने परीश्रम घेतले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा