Breaking

गुरुवार, ४ एप्रिल, २०२४

सरकारी कामात अडथळा केले प्रकरणी आरोपीस न्यायालयाने सुनावली शिक्षा*


*सरकारी कामात अडथळा केले प्रकरणी आरोपीस न्यायालयाने सुनावली शिक्षा*



टेंभुर्णी प्रतिनिधी:

टेंभुर्णी पोलीस स्टेशन अंतर्गत जुना सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील विठ्ठल जेन्टस या दुकानासमोर दिनांक 15 3 / 2019 रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास टेंभुर्णी पोलीस ठाण्याकडील कर्मचारी नाकाबंदी करीत होते सदर नाकाबंदी दरम्यान सोलापूर पुणे रोडने एक इसम मोटरसायकल वेगात घेऊन जात असताना नाकाबंदी करीत असलेल्या पोलिसांनी त्यास वाहन थांबवण्यास सांगितले असता त्यांनी त्याची मोटरसायकल नंबर एम एच .१२ .के एल. 7604 ही पुढे नेऊन थांबवली तेव्हा त्यास नाकाबंदी मधील पोलीस हेडकॉन्स्टेबल शिवाजी भोसले यांनी लायसन व कागदपत्राची मागणी केली असता आरोपीने कागदपत्रे देण्यास नकार देऊन तुम्हाला कागदपत्रे मागणीचा अधिकार काय व तुम्ही कोण कागदपत्रे मागणार असे म्हणून पोलिसांना जोरात जोरात बोलत होता. त्याचा त्याचा आवाज ऐकून पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय भानवसे हे त्याच्या जवळ आले त्यावेळी त्याने अशा माझ्यावरती कितीतरी केसेस झाले आहेत असे म्हणून अरे रवीची भाषा करून तुम्ही येथे कसे काम करतात तेच पाहतो असे म्हणून दमदाटी करून सरकारी कामात अडथळा केला होता सदर इसमास पोलीस ठाण्यास नेले त्याचे नाव गाव विचारले त्याने त्याचे नाव सागर अशोक पाटील राहणार रोपळे कव्हे .तालुका. माढा असे असल्याचे सांगितले सरकारी काम करीत असताना सरकारी कामात अडथळा केला म्हणून फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी भोसले यांनी आरोपीविरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल केला १९३/२०१९ भा दी वि कलम ३५३,५०६ गुन्हा दाखल केला पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन सबळ पुरावा गोळा करून आरोपी विरुद्ध मा ‌. न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले.
सरकार पक्षाच्यावतीने सदर गुन्हा शाबितीसाठी साक्षीदार तपासण्यात आले यातील फिर्यादी व साक्षीदार यांची साक्ष तसेच तपासी आमलदार पोलीस उपनिरीक्षक पि.के मस्के यांनी तपासा दरम्यान गोळा केलेले पुरावे हे सहा सरकारी वकील डी डी देशमुख यांनी मा. न्यायालयासमोर मांडले . सरकारी पक्षाचा पुरावा याचा विचार करून माननीय अति सह जिल्हा न्यायाधीश श्री आर एम कुलकर्णी साहेब यांनी आरोपी सागर अशोक पाटील वय 34 राहणार रोपळे कव्हे ता. माढा यास भादविक ५०६ अन्यवे दोषी ठरवून कोर्टउठेपर्यंत शिक्षा ठोठावली सरकार पक्षातर्फे ॲड श्री डी देशमुख यांनी काम पाहिले सदर केस मध्ये माननीय श्री अजित पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा माननीय श्री दीपक पाटील पोलीस निरीक्षक टेंभुर्णी पोलीस ठाणे यांनी फिर्यादी व साक्षीदार यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक पि. के  मस्के यांनी केलेला होता तसेच कोर्ट पेरवी अधिकारी म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल अमृत खेडेकर यांनी काम पाहिले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा