माढा तालुक्यातील अकोले-खुर्द येथील प्रतिभा रामभाऊ पाटील यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत विक्रीकर निरीक्षकपदी निवड झाली आहे.
*प्रतिभा रामभाऊ पाटील यांची विक्रीकर निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करताना संभाजी ब्रिगेडचे सचिन जगताप-जिल्हाध्यक्ष,सचिन खुळे-शहराध्यक्ष टेंभुर्णी,अजय गायकवाड-तालुकाध्यक्ष का.आ,विजय काळे-सदस्य मसेसं,रामभाऊ पाटील-मा.संचालक कृ.उ.बा.स,संपत पाटील,प्रतिक लोकरे
प्रतिभा पाटील यांचे प्राथमिक शिक्षण अकोले-खुर्द येथील बबनरावजी शिंदे विद्यालयात झाले.त्यांनी बी.एस्सी पुणे येथे फर्ग्युसन कॉलेजमध्ये पूर्ण केली.त्यांनी पुणे येथे दोन वर्षापासून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती.प्रतिभा पाटील यांचे भविष्यात युपीएससी परीक्षा क्रॅक करण्याचे ध्येय आहे.
या यशाबद्दल त्यांचा अकोले-खुर्द येथे सन्मान करण्यात आला.प्रतिभा ही कृउबाचे माजी संचालक रामभाऊ पाटील यांची कन्या असून तिची मोठी बहीण ही यापूर्वीच पोलीस उपनिरीक्षक झाली आहे.प्रतिभा पाटील यांचा या यशाबद्दल आ.बबनराव शिंदे,आ.संजयमामा शिंदे,जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे,लेबर फेडरेशनचे माजी चेअरमन भारत पाटील,विक्रम पाटील,भालचंद्र चिंतामण,सपोनि अंकुश चिंतामण,उद्योजक प्रा.दीपक पाटील,विजय काळे,नागनाथ पाटील ग्रामस्थ आदींनी अभिनंदन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा