Breaking

गुरुवार, १८ एप्रिल, २०२४

साईप्रसाद ढवळे राज्यस्तरीय मंथन परीक्षेत राज्यात सहावा*


*साईप्रसाद ढवळे राज्यस्तरीय मंथन परीक्षेत राज्यात सहावा*


   
टेंभुर्णी /प्रतिनिधी 

 : अकोले (खुर्द) ता माढा  बबनरावजी शिंदे विद्यालयाचा विद्यार्थी  साईप्रसाद आनंदराव ढवळे याने राज्यस्तरीय मंथन सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेत राज्यात सहावा  क्रमांक पटकावल्याने सर्व स्तरावरून कौतुक होत आहे
    सविस्तर वृत्त आशे की मंथन सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा 4 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात आली होती या स्पर्धचा निकाल नुकताच जाहिर झाला या स्पर्धा परीक्षेत मा. बबनरावजी शिंदे माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयातील खालील विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत येत उज्जवल यश संपादन केले                                १)  साईप्रसाद आनंदराव ढवळे ( इयत्ता 5 वी) ३०० पैकी २८८ गुण मिळवून राज्यात ६वा क्रमांक जिल्हयात १ ला क्रमांक
२) चि. चोपडे प्रतिक नानासाहेब (इयत्ता 5 वी ) ३०० पैकी २५२ गुण केंद्रात पहिला क्रमांक 
३) चि. पवार प्रथमेश समाधान ( इयत्ता 5 वी ) ३०० पैकी २५२ गुण केंद्रात पहिला क्रमांक
४) चि. कदम संग्राम बाळासाहेब ( इयत्ता 5 वी) ३०० पैकी २२४ गुण   केंद्रात दुसरा क्रमांक
५) कु. मोरे अनुष्का पोपट ( इयत्ता 5वी) ३०० पैकी २१८ गुण  केंद्रात ३रा क्रमांक
६) चि. काळे शिवतेज रेवणनाथ ( इयत्ता 5वी ) ३०० पैकी २१८ गुण केंद्रात ३रा क्रमांक
७)  चि. ओंकार नाथा बातखबर ( इयत्ता ६वी) ३०० पैकी १९४ गुण केंद्रात दुसरा क्रमांक
८) चि. सूर्यप्रताप अशोक पाटील ( इयत्ता ६ वी) ३०० पैकी १८८ गुण केंद्रात तिसरा क्रमांक
९) कु. श्रेया सुखदेव चौधरी ( इयत्ता - 7 वी ) ३०० पैकी २५६ गुण राज्यात १७वा जिल्हयात 5वा क्रमांक
१०) कु. प्रांजल तेजस नवले ( इयत्ता - 7 वी ) ३०० पैकी २४४ गुण केंद्रात पहिला क्रमांक
११) कु. श्रावणी मच्छिंद्र दिवटे ( इयत्ता-7 वी) ३००पैकी २४४ गुण केंद्रात पहिला क्रमांक
वरील सर्व विद्यार्थ्यांना मंथन सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल गुणवंत सर्व विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक  धनुसिंग रजपूत सर यांचे अभिनंदन करमाळा तालुक्याचे आमदार तथा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा . संजयमामा शिंदे , संस्थेचे सचिव तथा प्रशालेचे प्राचार्य मा .  .राजेंद्र  ठोंबरे सर प्रशालेतील जेष्ठ शिक्षक  संभाजी अनपट सर  , स. रा. मोरे प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका मा  . मधुरा सुरवसे मॅडम, यशवंत प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका. नेवसे मॅडम तसेच प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिकचे सर्व शिक्षक - शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा