कै. बाळासाहेब विठोबा ढवळे पाटील यांची पुण्यतिथी निमित्त विविध उपक्रम.
प्रसिद्ध.कीर्तनकार ह.भ.प समाधान महाराज शर्मा यांची कीर्तन सेवा.
आरोग्य विषयक अनेक उपक्रम.
टेंभुर्णी(प्रतिनिधी) धनंजय भोसले.
कै.बाळासाहेब विठोबा ढवळे पाटील यांची पुण्यतिथी दिनांक 4/4/24 रोजी सापटणे(टेंभुर्णी) येथे विविध उपक्रमाने संपन्न झाली या मध्ये प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प समाधान महाराज शर्मा यांनी अतिशय मनमोहक व प्रबोधनात्मक अशी कीर्तन सेवा बजावली यामध्ये त्यांनी अनेक दाखले देत उपस्थित जनसमुदायाला आपल्या कीर्तनाने मंत्रमुग्ध केले त्यांना सुरेख अशी गायन साथ ह.भ.प ओंकार महाराज जगताप यांनी दिली तर ह.भ.प विठ्ठल बापू माळी यांनी पखवाज साथ दिली याचबरोबर पुण्यस्मनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यामध्ये युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले तसेच आरोग्य विषयक उपक्रमामध्ये नेत्र तपासणी यामध्ये ओम आय क्लिनिक व श्री टेके आय क्लिनिक सांगली डॉक्टर बोराटे यांच्या सहकार्याने 150 नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली तसेच महिलांची हिमोग्लोबिन तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र सापटणे यांचे वतीने करण्यात आली यामध्ये 100 महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली तसेच अस्थिरोग तपासणी व उपचार पाटील हॉस्पिटल चे डॉ. राहुल पाटील व डॉ अजय बनसोडे यांच्या सहकार्याने करण्यास आले यामध्ये 150 नागरिकांची तपासणी करण्यात आली अशा समाज उपयोगी उपक्रमातून व प्रबोधनातून कैलासवासी बाळासाहेब विठोबा ढवळे पाटील यांचे प्रथम पुण्यस्मरण करण्यात आले यावेळी माढा तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यामध्ये पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह शिंदे ,यशवंत शिंदे, सुरेश बागल वामन भाऊ उबाळे लक्ष्मण खूपसे, मार्केट कमिटीचे संचालक दिलीप भोसले धनंजय मोरे, नागेश खटके तसेच रयत क्रांतीचे सुहास पाटील किसान सभेचे दादासाहेब देशमुख, रामभाऊ शिंदे जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पाटील आप्पासाहेब उबाळे, भारत शिंदे, पंचायत समितीचे सतीश पाटील व तालुक्यातून विविध गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे चेअरमन व संचालक उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन ग्रामपंचायत सापटणे स्वामी समर्थ सेवाभावी संस्था व सर्व ग्रामस्थ सापटणे यांनी केले माढा तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन तुकाराम उर्फ बंडू नाना ढवळे, मदन ढवळे, ज्ञानेश्वर उर्फ माऊली ढवळे यांनी उपस्थितीबद्दल सर्वांचे आभार मानले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा