*महाराष्ट्रात क्रॉप सायन्स मध्ये कु.इशिता दत्तात्रय ढवळे-पाटील प्रथम क्रमांक पटकावला*
टेंभुर्णी(प्रतिनिधी)शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील इ. बारावी बोर्डाचा नुकताच निकाल जाहीर झाला. यामध्ये लक्ष्मी-आनंद ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले. यामध्ये विज्ञान शाखेतील क्रॉप सायन्स विषयामध्ये २०० पैकी २०० गुण मिळवून कु.इशिता दत्तात्रय ढवळे हीने महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचे स्थान मिळविले. त्याचप्रमाणे इतर १२ विद्यार्थ्यांनी क्रॉप सायन्समध्ये १९० च्या पुढे गुण प्राप्त करुन गुणवत्ता यादीत आपले स्थान बळकट केले आहे. कु.कोमल राजेंद्र पाटोळे हिने 84.83 % मिळवून प्रथम, कु. इशिता दत्तात्रय ढवळे हिने 83.83 % मिळवून द्वितीय, कु.सिद्धी भीमराव लोंढे हिने 82.67 % मिळवून तृतीय,कु.स्वप्नाली सिद्धेश्वर देशमुख हिने 82.33 % मिळवून चतुर्थ तर कु.दिव्या लालासाहेब मिस्किन हिने 82 % मिळवून पाचवा क्रमांक पटकावला.
संस्थेचे अध्यक्ष योगेशजी बोबडे, सचिवा सौ.सुरजा बोबडे मॅडम यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पाठीवर कौतुकाची थाप दिली. यापुढेही येत्या काळात संस्थेचे अधिकाधिक विद्यार्थी गुणवंत होतील यासाठी आम्ही कायम कटिबद्ध आहोत असेही मत त्यांनी मांडले. यावेळी प्रशालेचे प्राचार्य विकास करळे, पीआरओ सागर खुळे व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा