Breaking

बुधवार, २९ मे, २०२४

विठ्ठलरावजी शिंदे प्रशालेचा शंभर टक्के निकाल



विठ्ठलरावजी शिंदे प्रशालेचा शंभर टक्के निकाल 


कन्हेरगाव (प्रतिनिधी)
           कन्हेरगाव तालुका माढा येथील सोजरताई बहुउद्देशीय विकास मंडळ निमगाव (टें) संचलित कै.विठ्ठलरावजी शिंदे प्रशाला या विद्यालयाचा दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये शंभर टक्के निकाल लागला असून 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे.

            यामध्ये प्रथम क्रमांक मोनाली चंद्रकांत डोके हिने 93.20% गुण मिळवत प्रथम प्रमुख मिळवला आहे तर भाग्यश्री शंकर गिरी हिने 93 टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला आहे.तर मयुरी संजय डोके-पाटील यांनी 91 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला आहे. या विद्यालयाचे दहावीच्या बोर्ड परीक्षेसाठी एकूण 42 पैकी 42 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यामध्ये 80 टक्के पेक्षा जास्त गुण वीस विद्यार्थ्यांनी मिळवले आहेत. 

                या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे, करमाळा माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे,प्राचार्य राजेंद्र ठोंबरे, प्राचार्य जवानसिंग राजपूत,मुख्याध्यापक अमोल लोंढे यांनी अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा