विठ्ठलरावजी शिंदे प्रशालेचा १०० टक्के निकाल
कन्हेरगाव (प्रतिनिधी)
दहावीची बोर्ड परीक्षा मार्च २०२४ रोजी घेण्यात आली होती . या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत कै. विठ्ठलरावजी शिंदे प्रशाला अंबाड येथील विद्यार्थ्यांनी SSC बोर्ड परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे.कु. समृद्धी सतीश हागारे (अंबाड केंद्रात व प्रशालेत प्रथम क्रमांक) ९५.८०%
( ५०० पैकी ४७९गुण ),राजवर्धन सतीश दराडे (अंबाड केंद्रात व प्रशालेत द्वितीय क्रमांक) ९५.२०%
( ५०० पैकी ४७६गुण )कु. अश्विनी तानाजी सरवदे. (अंबाड केंद्रात व प्रशालेत तृतीय क्रमांक)९४.००%
( ५०० पैकी ४७०) मार्च 2024 साठी एकूण 121 परीक्षार्थी समाविष्ट होते त्यापैकी १५ विद्यार्थी 90% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले तर 100 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह 19 विद्यार्थी प्रथम श्रेणी त तर 2 द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.
वरील सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल गुणवंत विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षकवृंद यांचे माढ्याचे आमदार बबनरावजी शिंदे,करमाळ्याचे आमदार तथा संस्थेचे संस्थापक संजयमामा शिंदे,संस्थेचे सचिव, प्राचार्य राजेंद्र ठोंबरे सर, प्राचार्य.जवानसिंग रजपूत तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा