Breaking

शनिवार, २५ मे, २०२४

रत्नाकर बेंबळेकर यांना सक्त विश्रांतीचा सल्ला...



रत्नाकर बेंबळेकर यांना सक्त विश्रांतीचा सल्ला...



 बेंबळे/ प्रतिनिधी               
           सोलापूर जिल्हा भाजपा कार्यकारिणीचे ज्येष्ठ सदस्य व ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष रत्नाकर विष्णुपंत कुलकर्णी- बेंबळेकर (वय 76) यांना डॉक्टरांनी सक्त विश्रांतीचा सल्ला दिला आहे. पक्ष कार्यासाठी सतत फिरणे, सततचा प्रवास, जागरण, नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्या कामी स्वतःच्या शरीर स्वास्थ्याचा विचार न करणे  रात्री होणारी जागरणे आणि वेळेवर आहार न घेता प्रकृतीची हेळसांड यामुळे मागील काही दिवसापासून बेंबळकर हे पाठीतील मणक्याच्या विकाराने त्रस्त झाले आहेत .नुकतेच त्यांना मिरज  (जि. सांगली) येथील कुलकर्णी हॉस्पिटलचे तज्ञ डॉ .जे के कुलकर्णी यांच्याकडे दाखवून सर्व तपासण्या करून  घेतल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना  एक ते दीड महिना सक्त विश्रांतीचा सल्ला देऊन औषध उपचार सुरू ठेवले आहेत, त्यामुळे रत्नाकर बेंबळेकर हे त्यांच्या बेंबळे येथील निवासस्थानी विश्रांती घेत आहेत.  कुलकर्णी यांचे फॅमिली डॉक्टर  यशवंत दगडे हे नियमित तपासणी व देखभाल करत आहेत .सोलापूर, पंढरपूर माळशिरस माढा अकलूज व परिसरातील ग्रामीण भागातील सर्वपक्षीय नागरिक बेंबळेकर यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा