Breaking

शनिवार, २५ मे, २०२४

प्रशांत कुंभार याची 11 लाख रुपयेच्या यंग इंडिया फेलोशीप साठी निवड.


प्रशांत कुंभार याची 11 लाख रुपयेच्या यंग इंडिया फेलोशीप साठी निवड.


बेंबळे/प्रतिनिधी.                  फोटो 

             सोलापूर जिल्ह्यातील परिते (ता.माढा) गावातील शेतकरी कुटुंबातील प्रशांत विलास कुंभार या युवकाची आंतरराष्ट्रीय दर्जाच्या यंग इंडिया फेलोशीप साठी निवड झाली आहे.
       दिल्ली जवळ असलेल्या अशोका विद्यापीठ येथे यंग इंडिया फेलोशिप अंतर्गत लिबरल स्टडीज हा अभ्यासक्रम चालविला जातो ज्यासाठी प्रशांतची निवड करण्यात आली. लिबरल स्टडिज हा अभ्यासक्रम जगातील विविध क्षेत्रातील उत्कृष्ट प्राध्यापकांद्वारे शिकवीला जातो. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना विविध कौशल्ये, बहुआयामी दृष्टिकोन आणि बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम शिकण्यास संधी मिळते. या फेलोशीप अंतर्गत प्रशांत यास ११ लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. दरवर्षी फेलोशिपसाठी जगभरातून युवक निवड प्रक्रियेत भाग घेत असतात. अतिशय अवघड आणि जटिल निवड प्रक्रीयेद्वारे जगभरातून १०० जणांची या प्रतिष्ठित फेल्लोशीप साठी निवड केली जाते. यापूर्वी प्रशांतने नुकतेच बेंगलोर मधील अझीम प्रेमजी विद्यापीठात एम ए डेव्हलपमेंट हा  अभ्यासक्रम शिष्यवृत्ती मिळवत यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. प्रशांत हा त्याच्या कुटुंबातील पहिला शिकणारा विध्यार्थी आहे. प्रशांत कुंभार चे प्राथमिक शिक्षण परितेतील  जिल्हा परिषद शाळेतून झाले. वडील अपंग असल्याने घरची परिस्थिती हालाखीची होती. त्यामुळे त्याने दहावीपर्यंतचे शिक्षण शासकीय आश्रम शाळेतून पूर्ण केले. पुढे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होउन पदवी शिक्षण अर्थशास्त्र या विषयात पुणे येथून पूर्ण केले. त्याला या प्रवासात आईचे कष्ट, एकलव्य इंडिया फाउंडेशन संस्था, आणि मित्रांची साथ मोलाची आणि प्रेरणादायी ठरली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा