अंतरवाली सराटी येथे जाऊन
मराठा आरक्षणासाठी विक्रमसिंह शिंदे यांचा पाठिंबा .
कन्हेरगांव दि प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले
मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषण स्थळी
अंतरवाली सराटी तालुका अंबड जिल्हा जालना येथे सभापती विक्रमसिंह बबनराव शिंदे यांनी रविवारी ९ जुन रोजी सायंकाळी सहा वाजता भेट देऊन आमरण उपोषणाला माढा तालुक्याच्या वतीने पाठिंब्याचे पत्र दिले .
मराठा समाज बांधवांना ओबीसी मध्ये कुणबी मराठा सगळे सोयरे या शब्दाचा अंतर्भाव करून लाभ मिळण्यासाठी आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मराठा समाज आरक्षणाचे जनक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास सभापती विक्रमसिंह शिंदे यांनी भेट देऊन मराठा आरक्षणास माढा तालुका व माढा विधानसभा मतदारसंघ यांच्या वतीने जाहीर पाठिंबाचे पत्र दिले .
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धनंजय मोरे , विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन देशमुख , पंचायत समितीचे उपसभापती धनाजी जवळगे, युवक नेते अमोल नलवडे, पत्रकार राजेंद्र केदार , सचिन डोके , नागेश जगताप उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा