Breaking

बुधवार, १२ जून, २०२४

विठ्ठलराव शिंदे कारखान्याचाऊस तोडणी वाहतूकीसाठी पहिला हप्ता दोन लाख रूपये बँकेत जमा- -आ.बबनराव शिंदे



विठ्ठलराव शिंदे कारखान्याचा
ऊस तोडणी वाहतूकीसाठी पहिला हप्ता दोन लाख रूपये बँकेत जमा-  -आ.बबनराव शिंदे


 बेंबळे.. प्रतिनिधी.      

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब या कारखान्याकडे पुढील ऊस गाळप हंगाम 2024-25 साठी करार करणेत आलेल्या ऊस तोडणी यंत्रणेस पहिला हप्ता दोन लाख रूपये बँकेत जमा करणेत आला असल्याची माहीती संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांनी दिली.
अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले की,  विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने पुढील ऊस गाळप हंगाम 2024-25 साठी युनिट नं.1 पिंपळनेर येथे 20 लाख व युनिट नं.2 करकंब येथे 6 लाख मे.टन असे एकूण 26 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ठ निश्चित केलेले आहे. या हंगामात दोन्ही युनिटकडे प्रतिदिन गाळपक्षमतेएवढा ऊस पुरवठा होणेसाठी आवश्यक ट्रक,ट्रॅक्टर,ट्रॅक्टरगाडी व बैलगाडी यंत्रणेचे करार करणेची कार्यवाही सुरू करणेत आलेली आहे. आजअखेर दोन्ही युनिटकडे मिळून बैलगाडी चे 500, ट्रॅक्टरगाडी चे 400 व ट्रॅक/ट्रॅक्टरचे 600 करार पूर्ण झालेले आहेत. दोन्ही युनिटकडे गाळप क्षमतेएवढा ऊस पुरवठा होणेच्या दृष्टीने उर्वरीत आवश्यक यंत्रणेचे करार लवकरच पूर्ण होत आहेत.  करार करणेत आलेल्या यंत्रणेस कारखाना धोरणानुसार ॲडव्हान्स वाटप करणेत येणार आहे. आजअखेर करार करणेत आलेल्या ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेस पहिला हप्ता दोन लाख रूपये प्रमाणे ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार यांच्या बँक खात्यात जमा करणेत आला आहे.
मागील सन 2023-24 ऊस गळीत हंगामात दोन्ही युनिट कडे तोडणी वाहतूक करणा-या ट्रक/ट्रॅक्टर,ट्रॅक्टरगाडी व बैलगाडी मुकादम यांची तोडणी वाहतूक बिले व साखरसंघ स्तरावर झालेल्या सामंजस्य करारानुसार नुकताच 34 टक्के वाढ, वाढीचा फरक व कमिशन डिपॉझीट संपूर्णपणे अदा करणेत आलेले आहे. पुढील सन 2024-25 गळीत हंगामासाठी दोन्ही युनिटकडे गाळप क्षमतेएवढा ऊस पुरवठा होणेसाठी ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेचे करार सुरू असून ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार व मुकादम यांनी कारखान्याचे शेती विभागाशी संपर्क करून करार करावेत. तसेच पुढील हंगाम यशस्वीरित्या पार पाडणेसाठी सभासद व ऊस पुरवठादार शेतक-यांनी जास्तीत जास्त ऊस नोंदी कारखान्याकडे देवून हंगाम यशस्वी करणेसाठी सहकार्य करावे असे आवाहन आ.शिंदे यांनी केले.

सदरप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे,कार्यकारी संचालक,जनरल मॅनेजर  व इतर खातेप्रमुख उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा