Breaking

गुरुवार, १३ जून, २०२४

आदर्श उद्योगरत्न पुरस्काराने विजयकुमार कोठारी सन्मानित..



आदर्श उद्योगरत्न पुरस्काराने विजयकुमार कोठारी सन्मानित..


बेंबळे.. प्रतिनिधी           

नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन (रजि.) बेळगावी व इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी (रजि.) बेळगावी कर्नाटक तर्फे देण्यात येणारा राष्ट्रीय पुरस्कार दिल्ली, गुजरात, गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र राज्यातून निवडक व्यक्तिमध्ये दिला जाणारा राष्ट्रीय 'आदर्श उद्योगरत्न गौरव पुरस्कार' येथील पंढरपूर मर्चंट बँकेचे उपाध्यक्ष व शितलादेवी ग्रामीण अर्बन बँकेचे चेअरमन उद्योगपती विजयकुमार कांतिलाल कोठारी देणेत आला. ह्या पुरस्कारामुळे आपणास प्रेरणा व प्रोत्साहन मिळणार आहेच. शिवाय आपला आदर्श इतरांनाही प्रेरणा देणारा आहे. असेच कार्य आपल्या हातून घडो व अनेक पुरस्काराकारिता पात्र व्हावे अशा सदिच्छा केंद्रीय कायदा मंत्री कर्नाटक माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली, मलेशिया राष्ट्र फौंडेशन व उद्योगपती डॉ. सिमा इंगोळे, केंद्रीय मंत्री रत्नमाला सावणूर, बेळगाव खा. अमरसिंह पाटील, दिल्ली विशेष राज्य अभियंता जयराज लोंढे, जिल्हा कमांडर होमगार्ड डिपार्टमेंट कर्नाटक सरकार अरविंद पट्टी, कोल्हापूर महापौर राजू शिंगाडे, उद्योगपती इजिप्त मॕक्सिको सीईओ एलिझाबेथ इस्लास लिआॕन, जिल्हा पोलीस प्रमुख बिदर कर्नाटक महेश मेघण्णावर यांच्या सह्यांचे सन्मान पत्र प्रदान करण्यात आले आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा