Breaking

रविवार, २३ जून, २०२४

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील वाढदिवसानिमित्त कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयात सर्वरोग निदान शिबिर संपन्न....*


*माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील वाढदिवसानिमित्त कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयात सर्वरोग निदान शिबिर संपन्न....*



कुर्डुवाडी, अरुण कोरे प्रतिनिधी,

चाळीस लाख लोकसंख्येच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यामानाने आम्ही फार थोडे कॅन्सर डाॅक्टर्स आहोत. आमच्याकडे येणारा पेशंट शेवटच्या क्षणी येतो तोकडी साधने, अपुऱ्या सोईसुविधा असतात. आम्ही प्रयत्न करुनही पेशंट वाचवता येईल अशी खात्री आम्ही देऊ शकत नाही. त्यामुळे बारामतीच्या धर्तीवर ऐक कॅन्सर हाॅस्पिटल होणे गरजेचे आहे अशी खंत डाॅक्टर शिवाजी साळूंखे यांनी सुरवातीलाच मांडली. 

कॅन्सरचे प्रमाण वाढत चालले असून यासाठी अशी मार्गदर्शन शिबिरे भरवणे गरजेचे आहे. याच बरोबर अत्याधुनिक हॉस्पिटल उभा करण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयदादा मोहिते पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यात अत्याधुनिक डेडीकेटेड कॅन्सर हॉस्पिटल विजयदादांच्या पुढच्या वाढदिवसापर्यंत उभा करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सध्याचे युगामध्ये माणसांनी स्वतःकडे लक्ष देण्याचे कमी केले असल्यामुळे आजाराचे प्रमाणात वाढ झाली आहे. नागरिकांनी आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे तरच भविष्यात व्यवस्थित राहू शकतो, यामध्ये महिलांकडे तर कुटुंबांची मोठी जबाबदारी असते त्यामुळे महीलांनी आरोग्यकडे जास्तीत जास्त लक्ष दिले पाहिजे असाही सल्ला अकलूजचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी दिला.
             कुर्डूवाडी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सर्व रोग व कॅन्सर निदान शिबिराचे शिवप्रतिष्ठान वतीने आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.
             यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा माढ्याच्या नगराध्यक्षा मीनलताई साठे, कल्पना जगदाळे, सुरेश बागल, सुहास शहा, शुभांगी श्रीरामे, प्रकाशभाई धोका, सरपंच स्वाती कुंभार, जयश्री माने, आशा टोणपे, प्रतीक्षा गोफणे, सुनिता सातव, ज्योती जगताप, वर्षा दास, मिराबी शेख, शोभा पाटोळे, वाहीद शेख, तात्यासाहेब गोडसे, अमर माने, प्रमोद बागल मच्छिंद्र कदम, सागर कोल्हे, शंकर बागल, हरीभाऊ भराटे, क्षितीज टोणपे आदी उपस्थित होते.
          कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संजयदादा टोणपे यांनी केले तर सुत्रसंचलन अमोल रजपूत यांनी केले.
      या शिबिरामध्ये दमा हृदयरोग, किडनीचे आजार मधुमेह पोटाची विकार हाडांचे विकार आदींचे तपासणी व निदान केले जाईल मोफत एक्सप्रेस थायरॉईड, ब्लड प्रेशर, मधुमेह, ईसीजी आदीची तपासणी मोफत करण्यात आली. या तपासणीत यामध्ये मोठे आजार आढळल्यास केशरी व पिवळे रेशन कार्ड धारकांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना मार्फत सर्व ऑपरेशन मोफत केले जाणार आहेत. 
        या शिबिरासाठी डॉ. अजित आव्हाड, डॉ. सौ. सारंगा बुरगुटे आव्हाड, डॉ .विकास खामकर, डॉ. अभिजीत कोकाटे, डॉ, शिवाजी साळुंखे, डॉ. सुयोग बुरगुटे, डॉ. नितीन भोरे, डॉ. ब्रिजेश भंडारे, डॉ. प्रद्युम्न सातव डॉ. शशीकांत त्रिंबके यांनी तपासणी केल्या.

              (चौकट)
      आगामी विधानसभा निवडणुक जिंकायचीच असेल तर शिवतेजसिंह मोहिते पाटलांनी माढा मतदारसंघातून लढवावी लागतेय अशी विनंती माढ्याचे माजी जिल्हा परीषद सदस्य आनंदआप्पा कानडे यांनी केली. यामुळे उपस्थितातून एकच चर्चा सुरू झाली.
—--

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा