दुचाकी अपघाता मध्ये तरुणाने गमावला जीव
महाड (मिलिंद माने)
शुक्रवारी रात्री महाड तालुक्यातील केंबुर्ली गावाजवळ मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या मोटरसायकल अपघातात तालुक्यातील दासगाव येथील एक तरुण जागीच ठार झाला. महामार्गावरील वळणे कायम असल्याने महामार्गावरील अपघात मालिका आजही कायम असल्याचे दिसून येत आहे.
संदेश ठकसेन निवाते - ३० रा.दासगाव असे मृत तरुणाचे नाव असून तो महाड औद्योगिक वसाहती मधील इफ्का केमिकल या कंपनीत कामाला जात होता. भर पावसामध्ये केंबूर्ली गावाजवळील वळणावर तो ज्या दुचाकीवरून जात होता ती दुचाकी घसरली. आणि रस्त्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या दुभाजकावर जोरात आदळली. हा अपघात सायंकाळी सातच्या सुमारास घडला. अपघातामध्ये या तरुणाच्या पायाला तसेच डोक्याला गंभीर इजा झाली. यामध्ये त्याचा जागेचा मृत्यू झाला. या तरुणाच्या मृत्यूनंतर गावांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यानंतर महाड ग्रामीण रुग्णालयात शवाविच्छेदन करून त्याचे पार्थिव कुटुंबियांच्या ताब्यात दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा